Header Ads

Header ADS

शिवशाही बसचा गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात

 

Shivshahi-bus-in-an-attempt-to-save-a-cow-accident


शिवशाही बसचा गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात 

लेवाजगत न्यूज अमरावती- नागपूर महामार्गावर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटल्याची घटना घडली आहे.

   दरम्यान बसचालकाने सांगितले की, मी नागपूरहून अकोल्याकडे बस घेऊन जात होतो. त्यावेळी अचानक एक गाय महामार्गावर धावत आली. बसवर नियंत्रण मिळवण्याचा मी प्रयत्न केला, पण माझी गाडी उलटली. गाडीचा अपघात झाला तेव्हा बसमध्ये एकूण ३५ प्रवाशी होते. यापैकी २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

  रविवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. नागपूरहून ही शिवशाही बस अकोल्याच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. मात्र अमरावती-नागपूर महामार्गावर क्रमांक ६ वर बसच्या समोर एक गाय आली. तिला वाचवण्याचा प्रयत्न शिवशाही बस चालकाने केला. यादरम्यान त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले.तर जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.




   या अपघातामुळे अमरावती-नागपूर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर क्रेनच्या मदतीने शिवशाही सरळ करून महामार्गा सुरू करण्यात आला.

   बसचा चालक म्हणाला की, मी नागपूरहून अकोल्याकडे बस घेऊन जात होतो. त्यावेळी अचानक एक गाय महामार्गावर धावत आली. मी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण माझी गाडी उलटली. माझ्या बसमध्ये एकूण ३५ प्रवाशी प्रवास करत होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.