Header Ads

Header ADS

शिवराजे मित्र मंडळ जे. एन. पी. टी. तर्फे टाऊन शिप येथे भव्य दिव्य नाईट दही हंडी चे आयोजन

 

Shivraje-Mitra-Mandal-JN-P-T-organized-a-magnificent-Divya-Night-Dahi-Handi-at-Township-

शिवराजे मित्र मंडळ जे. एन. पी. टी. तर्फे टाऊन शिप येथे भव्य दिव्य नाईट दही हंडी चे आयोजन                     उरण (सुनिल ठाकूर ). सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील जे.एन. पी. टी. टाऊनशिप येथे शिवराजे मित्र मंडळा चे सल्लागार विश्वास्त दिनेश पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीप ठाकूर, अध्यक्ष केतन घरत ,कुणाल घरत, विश्व् जीत घरत, संदेश ठाकूर, करण पाटील, स्वप्नील साळुंखे, अक्षय घरत, सुमित ठाकूर, मयूर भोईर, शेखर घरत, मनीष पाटील, सनील म्हात्रे, यश राज ठाकुर यांनी शॉपिंग सेंटर येथील मैदानावर भव्य दिव्य अशा नाईट दही हंडी चे आयोजन करण्यात आले होते. 





                      सदर दही हंडीचे पूजन आणि आरती च्या वेळी     शेकाप रायगड जिल्हा खजिनदार प्रितम म्हात्रे, मा.आमदार मनोहर भोईर, मंडळाचे सल्लागार प्रदीप ठाकूर, सौ. रजनी ठाकूर, श्री व सौ, जगजीवन भोईर, यांनी केली.    सुरवातीस स्टेप आर्ट अकॅडमी च्या नृत्या नी प्रेक्षकांची मने जिंकली. सेलिब्रेटी गायक मयूर नाईक व सोनाली भोईर यांच्या छेकडे वाल्या गाण्याला प्रेक्षकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. कार्यक्रमात मयूर नाईक, सोनाली भोईर, रिया कडू अपूर्वा पाटील, पियुषा कोळी, या सेलिब्रेटीनी दही हंडी कार्यक्रमाला रंगत आणली.             सदर कार्यक्रमास   शेकाप रायगड जिल्हा खजिनदार प्रितम म्हात्रे, मा.आमदार मनोहरश्ठ भोईर, ऍड. रत्नदीप पाटील., कामगार नेते रवी घरत, सुमित वाणी, प्रणित पाटील कुणाल पाटील (सरपंच पागोटे )आदिनी हजेरी लावली होती.अखेरीस जरी मरी आई (पिरकोन )गोविंदा पथ काने शिवराजे मित्र मंडळाची वर्ष 16 वे दही हंडी फोडली.   सदर कार्यक्रमाचे शानदार निवेदन दर्शना माळी यांनी केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.