Header Ads

Header ADS

सावदा येथे मुस्लिम बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंदला शंभर टक्के प्रतिसाद

Sawada-here-Muslim-brothers-in-spontaneous-response-to-Bandala-hundred-percent-response-to-prohibition-of-the-atrocities-on-Hindus-in-Bangladesh


सावदा येथे मुस्लिम बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंदला शंभर टक्के प्रतिसाद

 लेवाजगत न्यूज सावदा - बांगला देशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे करण्यात जळगांव जिल्ह्या बंदच्या  आवाहनास सावदा शहरात  व्यावसायिक नागरिक यांच्यासह मुस्लिम बांधवांनी  बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने  सावदा शहर शंभर टक्के बंद पाळण्यात येऊन बांगलादेश येथे झालेल्या  हिंदू वरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला.




           दरम्यान सकाळी साडे नऊ  येथील गांधी चौकातून एक भव्य मूक मोर्चा काढण्यात आला शहरातील विविध भागातून हा मोर्चा निघून परत गांधी चौकात येऊन संपन्न झाला. यात भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, अँड. कालिदास ठाकूर, अभय वारके, विक्की भिडे ,भरत नेहते यांचे सह शहरातील सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यावेळी सावदा पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील ,पोलीस उपनिरीक्षक अन्वर तडवी  यांचे सह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान शहारत दिवसभर कडकडीत बंद असल्याने सदैव गजब असणारा बस स्थानक परिसर, इंदिरा गांधी चौक, छत्रपती संभाजी चौक,चांदणी चौक,भगवान महावीर चौक,दुर्गा माता चौक,बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग, साई बाबा मंदिर परिसर,एम आय डी सी परिसर आदी भागात हॉटेल,मेडिकल,दवाखाने,हॉस्पिटल,कापड दुकान व इतर सर्व व्यावसायिक दुकान चालक यांनी सहभाग घेतल्याने शुकशुकाट जाणवत होता.

   शहरात  पेट्रोल पंप व सरकारी कार्यलय,बँक,पालिका  मंडळ कार्यालय,पोस्ट ऑफिस,महावितरण,दुय्यम निबंधक कार्यालय ही आस्थापने  सुरू होती  तर शाळा महाविद्यालये बंद होती.किरकोळ रिक्षा वगळता बस सुरू होत्या.

    आजच्या या उस्फुर्त दिलेल्या व्यावसायिकांचा प्रदिसाद चहाच्या टपरी सुद्धा आज बंद असल्याचे आज नागरिकांच्या निदर्शनास आले.

आजच्या सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आलेल्या बंदचा फटका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिलांना बसला केवायसी अपूर्ण असलेल्या महिला झेरॉक्स दुकान न बस बंद असल्याने या चौकातून त्या चौकात व बँकेत फेऱ्या मारताना दिसत होत्या सर्वात जास्त फटका आज त्या महिलांना बसला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.