Header Ads

Header ADS

सावदा पोलीस ठाण्यात,"नरबळीतच्या संशयावरून जीव गमावलेल्या युवकाच्या नातेवाईकांचा" गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या

 

सावदा पोलीस ठाण्यात,"नरबळीतून जीव गमावलेल्या युवकाच्या नातेवाईकांचा" गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या

नरबळीतून  संशयावरून जीव गमावलेल्या युवकाच्या नातेवाईकांचा सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या.

लेवाजगत न्यूज सावदा- येथील तरुण गुलाब सुरेश तायडे (वय २५) रा. सावदा हतनूर धरण येथील तापी नदीपात्रात  बुडाला होता.या तरुणाचा मृतदेह रायपूर गावाजवळ तापी नदीत दि.२०रोजी संध्याकाळी आढळून आला होता. २१ रोजी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात सावदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.





     अंत्यसंस्कारावरून परतत असतानाच नातेवाईकांनी दिनांक २१ रोजी सकाळी १० वाजेपासून तर एक वाजेपर्यंत दोषींवर  गुन्हे दाखल करण्यासाठी सावदा पोलीस ठाण्यात जण आंदोलन केले.त्याच्या सोबत  असलेल्या दोन व्यक्तीने त्याला  नरबळी साठी  हतनूर धरणावर सोबत नेला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.सोबत असलेल्या व्यक्तीवर अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.  

      गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल तीन तास नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. शेकडो महिला व पुरुषांनी  आंदोलनात भाग घेतला. यावेळी आरोपी ताब्यात मिळण्यासाठी ही जमावाने पोलिसांकडे मागणी केली. यावेळी जमावाला शांत करण्यासाठी निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, फैजपूर पोलीस ठाण्याचे  पोलीस उपनिरीक्षक शेख सय्यद, सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न केले.निंभोरा व फैजपूर येथील पोलीसबळ बंदोबस्त मागवण्यात आले होते.

कालिंकेचा भक्त म्हणून घेणारा बाबा ?

     काहीतरी चांगलं होईल यासाठी सावदा येथील स्वतःला कालिंकेचा भक्त म्हणून घेणारा बाबा याने मयत गुलाब तायडे यास काहीतरी आमिष देत हतनुर धरणावर  घेऊन गेला. त्या मांत्रीकांवर विश्वास ठेवत हतनुर धरणा जवळील तापी नदीपात्रात डुबकी घ्यायला लावली यात तो पुन्हा वर आलाच नाही. तो बुडाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. तशा प्रकारचा व्हिडिओ देखील नातेवाईकांकडे असल्याचे यावेळी बोलले जात होते. काहीतरी प्राप्तीसाठी त्याचा नरबळी दिल्या बाबतची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यानुसारच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत  संबंधित संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली होती

जादूटोणा विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी 

जोपर्यंत संबंधितांवर जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोरून हटणार नाही अशी भूमिका ठिय्या आंदोलकांनी घेतल्याने सावदा पोलिसांसमोर पेच निर्माण झाला होता परंतु शेवटी नातेवाईकांशी चर्चा करीत संबंधित दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती सावदा पोलिसांकडून देण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.