सावदा येथील राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयात पहिली प्रसुती सुखरूप
सावदा येथील राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयात पहिली प्रसुती सुखरूप
लेवा जगत न्यूज सावदा- येथे याने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बांधलेल्या राजश्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयात बुधवार रोजी पहिलीच महिला प्रसूती झाली. यावेळी डॉक्टर सचिन पाटील व डॉक्टर श्रुती एस टोके यांनी सुखरूप अशी प्रसुती आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने केली.बाळाचे वडील इलियास खान अय्युब खान व आई जरिना बी इलियास खान शेखपूरा सावदा येथील असून त्यांनी डॉक्टर व संपूर्ण स्टॉप यांचे आभार मानले.
येथे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे नवीन इमारतीचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचे हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन झाले होते यावेळी खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री आ एकनाथ खडसे,आ चंद्रकांत पाटील सह परिसरातील लोकप्रतिनिधी नागरिक उपस्थित होते.
येथे अद्यावत मशिनरी सह संपूर्ण स्टॉप कार्यरत असून दवाखान्यात आता प्रस्तुती प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे व रुग्णांना आजारपणावर उपचार सुद्धा सुरू असून तब्येतीनुसार ऍडमिट ची सोय सुद्धा येथे झाली असून परिसरातील व शहरातील रुग्णांनी राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयाचा रुग्णांनी लाभ घ्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत