Header Ads

Header ADS

सावदा येथे भव्य तिरंगा यात्रा संपन्न पालिकेसह,पोलीस हायस्कुलचे विद्यार्थी सहभागी

Savada-here-Grand-Tricolor-Yatra- Abundant-Municipality-with-Police-High-School-Students-Participate


सावदा येथे भव्य तिरंगा यात्रा संपन्न  पालिकेसह,पोलीस हायस्कुलचे विद्यार्थी सहभागी

 लेवाजगत न्यूज सावदा- १५ ऑगस्ट "स्वातंत्र्य दिन" या राष्ट्रीय सोहळ्याच्या निमित्ताने नगरपरिषद सावदा ,श्री आ.गं. हायस्कूल व ना. गो.पाटील ज्युनिअर कॉलेज व श्री.नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर व सावदा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

       या यात्रेमध्ये शंभर फूट लांबीचा तिरंगा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार १३ , १४, १५ या तीन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

        आज १३ ऑगस्टला तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले होते. ही तिरंगा यात्रा श्री . आ.गं. हायस्कूल  येथून सुरू होऊन बस स्थानक समोरील  बनाना सिटी पुतळ्याला वळसा घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ यात्रेचा समारोप झाला.

           



       या यात्रेच्या सुरुवातीला  हायस्कूल  येथे , महाशय मुख्याधिकारी  भूषण वर्मा , सावदा पोलीस ठाण्याचे ए.पी.आय. विशाल पाटील  व श्री आ गं हायस्कूलचे प्राचार्य  पी जी भालेराव  या तिघांनी सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मित्रांना सोबत घेऊन वृक्षारोपण केले. 

       सदर रॅलीमध्ये श्री ना गो पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शंभर फुटाचा ध्वज अतिशय सन्मानाने  आपल्या हातामध्ये धारण करून यात्रेमध्ये सहभागी झाल्या.

       एन.सी.सी ग्रुप चे सर्व कॅडेट्स यांनी या यात्रेच्या अग्रभागी राहून ध्वजास सन्मानपूवक मानवंदना दिली.

        याप्रसंगी मुख्याधिकारी श्री भूषण वर्मा व ए.पी.आय श्री विशाल पाटील , प्राचार्य श्री पी.जी भालेराव  यांनी या यात्रेला हिरवा ध्वज दाखवून ही यात्रा सुरू केली. 

          वेगवेगळ्या देशभक्तीपर गीतांच्या सुरांमध्ये व विविध घोषणांच्या निनादांमध्ये ही तिरंगा  यात्रा निघाली.  जागोजागी या यात्रेचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्साहाने यात्रेमध्ये घोषणा दिल्या. सर्वात शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या यात्रेचा समारोप झाला. 

          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या ठिकाणी श्री नंदू पाटील सर यांनी सर्व विद्यार्थी व उपस्थितांना तिरंगा प्रतिज्ञा देवून संपूर्ण यात्रेचे संचलन केले.  त्यानंतर ध्वजाची सन्मानाने घडी करण्यात आली व तेथून सर्व विद्यार्थी परत पुन्हा आपापल्या विद्यालयांमध्ये रवाना झाले. अतिशय सूर व्यवस्थित अतिशय सो नियोजित व अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ही यात्रा सन्मानपूर्वक पूर्ण झाली या यात्रेमध्ये , मुख्याधिकारी श्री भूषण वर्मा साहेब एपीआय श्री विशाल पाटील साहेब प्राचार्य श्री पीजी भालेराव सर नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सौकुशलता ठोंबरे मॅडम व सर्व शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते व या यात्रेमध्ये सम्मिलित झाले .

       दोन्ही शाळांचे विद्यार्थी फार मोठ्या संख्येने संमिलीत झालेले होते.

        या यात्रेच्या आयोजनामध्ये नगरपालिकेचे श्री सतीश पाटील, श्री विजय चौधरी,श्री नंदकिशोर पाटील , श्री एस एम महाजन ,श्री अनिल नेमाडे  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.