सांगवी बुद्रुक शाळेत बाल रक्षा किट वाटप व आरोग्य तपासणी
सांगवी बुद्रुक शाळेत बाल रक्षा किट वाटप व आरोग्य तपासणी
लेवाजगत न्यूज सांगवी बुद्रुक -बुधवार या दिवशी ज्योती विद्या मंदिर व ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री डॉ.भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालय सांगवी बु ll ता. यावल जि.जळगाव येथे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची चैतन्य आयुर्वेद रुग्णालय भुसावळ व आयुष मंत्रालय यांच्यातर्फे आरोग्य तपासणी व बाल रक्षा किट वाटप करण्यात आले. यामध्ये ९० मुले व ६७ मुली असे एकूण १५७ विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला. आरोग्य तपासणीसाठी चैतन्य आयुर्वेद रुग्णालयातील वैद्य व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी कार्यकारी मंडळ व शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत