सर्पदंशग्रस्त मजुराला संदीप सावळें कडुन तात्काळ मदतीचा हात
सर्पदंशग्रस्त मजुराला संदीप सावळें कडुन तात्काळ मदतीचा हात
रावेर प्रतिनिधी -अहीरवाडी (ता. रावेर) येथील एका शेतात टरबूज काढण्यासाठी आलेल्या मजुराला सर्पाने चावा घेतल्याने एक भीषण घटना घडली. बुरहानपुर येथील केसर हरशिग बारेला नावाचा मजूर, सुशांत रामदास चौधरी यांच्या शेतात टरबूज काढत असताना सर्पदंशाचा बळी ठरला. या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये खळबळ उडाली.
सर्पदंशाची माहिती मिळताच स्थानिक आणि नेहमीच लोकांच्या मदतीला धावून जाणारे संदीप सावळे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह - सुशांत चौधरी, जीवन जाधव आणि मोहन महाजन यांना सोबत घेत बुरहानपुर येथील मजूराला तातडीने ग्रामीण रुग्णालय रावेर मदत पुरवली. या सर्वांनी मिळून केसर हरशिग बारेला याला संदीप सावळे यांच्या स्वतःच्या खाजगी वाहनाने रावेर ग्रामीण रुग्णालयात नेले.
सध्या केसर बारेला याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेत संदीप सावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. सावळे यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत