सहस्रदल कमळ फुलले डॉ कुंदनलाल चौधरी यांचे घरी
सहस्रदल कमळ फुलले डॉ कुंदनलाल चौधरी यांचे घरी
लेवाजगत न्यूज सावदा-येथील स्वामीनारायण नगर येथील रहिवाशी डॉ कुंदनलाल चौधरी व डॉ उज्वला चौधरी यांचे घरी शुक्रवार रोजी सहस्रदल कमळ फुलले यांचे त्यांनी विधिवत पूजन केले यावेळी आप्तेष्ठ मित्रपरिवार उपस्थित होता.
हिंदू पुराणांमध्ये साक्षात ब्रम्हा व विष्णु न चे जन्मस्थान मानले गेलेले सहस्त्रदल पदम सहजासहजी कुणाकडे फुलत नाही .विष्णूंना अतिप्रिय असलेले सहस्त्रदल कमळ हजारो पाकळ्यांनी युक्त असते.माँ लक्ष्मी जिथे हे कमल फुलते तिथे सदा वास करते.अशा या सहस्त्रदल कमळाच्या दर्शनाने सर्व पापक्षय होतो .
सहस्त्रदल कमलाचा समावेश निलंबोनेसी या कुटुंबात होतो.ही अत्यंत दुर्मिळ अशी भारतीय जलवनस्पती आहे .हे फुल मार्च ते ऑगस्ट या महिन्यात फुलते व एकदा फुललेले फुल साधारण ६ते ८ दिवस तसेच फुललेले राहते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत