रावेर येथे रेशन दुकानदार वाटपला कंटाळून ई-पॉस मशिनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणार
रावेर येथे रेशन दुकानदार वाटपला कंटाळून ई-पॉस मशिनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणार
लेवाजगत न्यूज रावेर-पुणे येथिल अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटना व केरोसीन परवानाधारक महासंघ, मार्गदर्शनाने शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारास धान्य वाटप करण्यासाठी मिळालेले अत्याधुनिक ५ जी ई-पॉस मशिन, सर्व्हर डाऊनच्या अडचणीमुळे कुचकामी ठरले आहे. सुमारे ८ ते १० दिवसापासून सर्व्हर सतत बंद असल्यामुळे पॉस मशीन काम करीत नसल्याने दुकानदारांची धान्य वाटप थांबली आहे. त्यामुळे कार्डधारक आणि दुकानदार यांच्यामध्ये संघर्षाची परिस्थती निर्माण झाली आहे. वारंवार दुकानाच्या फेऱ्या मारल्यामुळे कार्डधारक कंटाळून आक्रमक झाले आहे. दुकानदारांची मानसिक स्थिती खराब झाली आहे.अशी परिस्थिती निर्माण झाल्याने स्वस्त धान्य दुकान चालकांकडे असलेले ५जी पॉश मशीनची अंत्ययात्रा काढून मशीन तहसिलदार यांचे कडे दिनांक ५ रोजी जमा करणार असल्याचे निवेदन रावेरचे तहसिलदार बंडू कापसे यांना दिले आहे.
राज्य संघटनेच्या निर्णयानूसार सर्व्हर बंदच्या वारंवार त्रासाला कंटाळून आम्ही रावेर तालुक्यातील सर्व दुकानदार येत्या ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता कुचकामी ठरलेल्या ई-पॉस मशिनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा वाजतगाजत काढणार आहोत. सदरची अंत्ययात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते तहसिल कार्यालय पर्यंत काढून मा. तहसिलदार साहेब यांचे कार्यालयात जमा करणार आहे. गोरगरीबांची धान्यासाठी कुंचबना होऊ नये त्यांना वेळेवर धान्य मिळणेसाठी व शासनाचा निषेध करणेसाठी हे पाऊल उचलले आहे. गोरगरीब जनतेस व लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन वर उल्लेख केलेले आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार आहोत.त्यावर कैलास पाटील,दिनेश महाजन,दिलीप साबळे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत