Header Ads

Header ADS

रक्षाबंधनाच्या दिवसात चार भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू

 



रक्षाबंधनाच्या दिवसात चार भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू 



लेवाजगत न्युज चाळीसगाव:- धरण परिसरात खेळायला गेलेल्या

चार सख्या बहिण भाऊंचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि १८ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. रक्षाबंधणाच्या पुर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार चाळीसगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील उदय सुधाकर अहिरे यांच्या शेतात शेतीच्या कामासाठी मध्यप्रदेश राज्यातील शेंधवा तालुक्यातील दुखणी गावातील सुभाषसिंग पावरा हे त्यांच्या पत्नी व ५ मुली व एक मुलासह राहत होते. यावेळी सुभाषसिंग पावरा यांची मोठी मुलगी संजना भांडे घासण्यासाठी पिंपळखेड गावाजवळ असलेल्या के. टी. वेअर धरणाच्या काठावर गेली. यावेळी मोठी बहिण संजना सोबत लहान बहिण रोशनी, शिवांजली, आराध्या व भाऊ आर्यण हे के.टी. वेअर येथे गेले. तर लहान बहिण परी ही घरी होती. यावेळी ते धरणाच्या जवळ गेले असतांना पाय घसरल्याने ते पाण्यात पडले आणि काही समजण्या आधीच चारही सख्खे बहिण भाऊ पाण्यात बुडाले. घटनास्थाळी मदताकार्यासाठी काहींनी धाव घेत पोलिसांसमोर (रोशनी वय ९ वर्ष,) (शिवांजली वय ८ वर्ष)( आराध्या ४ वर्ष) व( भाऊ आर्यण वय ३ वर्ष) यांना पाण्यातून बाहेर काढत चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी.

 डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चारही सख्या बहिण भाऊंना मृत घोषित केले.

या घटनेनंतर चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती. मृत चार बहिण भाऊंचा मृतदेह बघून आई वडीलसांह कुटूंबाने आक्रोश केला. रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला चारही सख्या बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.