रेणुका ट्रेडर्स चे मालक सुहास भंगाळे यांनी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिले आज मध्यान भोजन
रेणुका ट्रेडर्स चे मालक सुहास भंगाळे यांनी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिले आज मध्यान भोजन
लेवा जगत न्यूज सावदा येथील देशमुख वाडयातील लोकमान्य शिक्षक प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरात शासनाच्या मार्गदर्शनानुसार लोकसभागातून वर्षातून चार वेळेस भोजन देण्यात चे सुचित करण्यात आले आहे त्या अनुषंगाने गुरुवार रोजी देशमुख वाडा येथील प्राथमिक शाळेत प्रसिद्ध व्यापारी रेणुका ट्रेडर्सचे संचालक सुहास शालिग्राम भंगाळे यांनी आज पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्फत मध्यान भोजन दिले.
शासनाच्या पंतप्रधान शक्ती पोषक आहार योजनेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दुपारी शालेय पोषक आहार शासनामार्फत दिला जातो. पण त्यात थोडा बदल असावा म्हणून शासनाने वर्षातून चार वेळेस लोकसहभागातून निष्ठांना सह पोषक असा आहार विद्यार्थ्यांना मिळावा या हेतूने ही योजना सुरू केली आहे.या योजनेच्या मार्फत आज येथील देशमुख वाड्यामधील लोकमान्य शिक्षक प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत असलेल्या पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आज लोकसहभागच्या माध्यमातून रेणुका ट्रेडर्स संचालक सुभाष शालिग्राम भंगाळे यांच्यामार्फत आज प्रथमच लोकसहभागातून भोजन देण्यात आले. यावेळी भाजी पोळी व मिष्ठांन असा हा मेनू मुलांना नवीनच असल्याने आवडला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उषा रायमोळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी लोक सहभागातून भोजन देणाऱ्या भंगाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत