Header Ads

Header ADS

श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथे श्रावण मास निमित्त शिवपुराण कथेचे आयोजन

 

Organization of-Shiva-Mahapurana-story-on-Shravan-month-at-Sri-Swaminarayan-Temple-Savada-
          (फोटो-आजची शृंगार सजावट)

श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथे श्रावण मास निमित्त शिवपुराण कथेचे आयोजन

Organization of-Shiva-Mahapurana-story-on-Shravan-month-at-Sri-Swaminarayan-Temple-Savada-


लेवाजगत न्यूज सावदा- येथील वडतालधाम द्विशताब्दी महोत्सवानिमित्त सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिर मध्ये श्रावण मास निमित्त शिवमहापुराण कथेचे आयोजन आज सोमवार पासून रोज संध्याकाळी मंदिरात  करण्यात आले आहे. तरी भाविकांनी कथा श्रवणासाठी उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टीतर्फे करण्यात आले आहे.




      वडताळ धाम द्विशताब्दी महोत्सव अंतर्गत सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शास्त्री स्वामी अनंत प्रकाश दासजी यांच्या वाणीतून शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.  कथा श्रवणात करिता सर्व भक्त भाविक,महिला पुरुष,तरुण,तरुणींनी आज सोमवार पासून दररोज संध्याकाळी आठ ते नऊ या वेळात कथा श्रवणासाठी उपस्थित राहावे.

     श्रावण महिन्याच्या निमित्त मंदिरात दर सोमवारी विविध सजावट करून भजन कीर्तनाचा कार्यक्रम सह ते सात या वेळात आयोजित करण्यात येतो.या विविध आकर्षक अशा सजावटीच्या व मंदिरातील देव हरिकृष्ण महाराज व राधाकृष्ण देव यांची सजावट पुजारी सत्यप्रकाश स्वामी ही करीत असतात,कोठारी स्वामी स्वयंप्रकाश दासजी,धर्म किशोर दासजी, लक्ष्मीनारायण,स्वामी माधव भंडारी यावेळी मंदिरात त्यांच्या मार्गदर्शनासाठी उपस्थित असतात. तरी भाविक भक्तांनी या श्रावण महिन्यात होणाऱ्या या प्रत्येक उत्सवात श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथे उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व सहभागी व्हावे.

     आजमंदिरातील हरिकृष्ण महाराज राधाकृष्ण देव यांना  शंकर-पार्वतीचे रूप देऊन उत्कृष्ट अशी सुरेख शृंगार सजावट करण्यात आली आहे. या दर्शनाचाही भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोठारी व सत्संग महिला समाज व ट्रस्टी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.