फैजपूर येथिल जे.टी.महाजन इंजीनियरिंग कॉलेज मध्ये इंटर्नशिप प्रोग्रामचे आयोजन
फैजपूर येथिल जे.टी.महाजन इंजीनियरिंग कॉलेज मध्ये इंटर्नशिप प्रोग्रामचे आयोजन
लेवाजगत न्यूज फैजपुर -विविध उद्योगांमध्ये पायथॉन हे एक महत्त्वपूर्ण कौशल्य म्हणून पुढे येत असल्याने या क्षेत्रात विशेष प्रशिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल आणि त्यांच्या करिअरच्या संधी वाढतील, याउद्देशने जे.टी.महाजन इंजीनियरिंग कॉलेज, फैजपूर येथे ऑनलाइन पायथन इंटर्नशिप प्रोग्रॅमचे आयोजन ७ जुलै ते ८ ऑगस्ट २०२४ दरम्यान करण्यात आले. हा इंटर्नशिप प्रोग्रॅम विद्यार्थ्यांच्या समर व्हेकेशन मध्ये घेण्यात आला.
सदर कार्यक्रम पुण्याच्या रिलायेबल आयटी स्कूल तर्फे आयोजित करण्यात आला.
या पायथन इंटर्नशिप प्रोग्रॅमचे उद्दिष्ट पायथनमधील आवश्यक साधने, तंत्रे आणि संकल्पनांवर सर्वसमावेशक प्रशिक्षण प्रदान करणे आहे.
या प्रशिक्षणामध्ये, पायथन म्हणजे काय?, पायथनचा इतिहास, पायथनचे फायदे, प्रोग्रामिंगची अद्ययावत माहिती देण्यात आलेली आहे. या इंटर्नशिप प्रोग्रॅममुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या व व्यावसायिक विकासाच्या संधी देखील मिळतील.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.आर.डी.पाटील, प्र.प्राचार्य डॉ.के.जी.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी, डॉ.पी.एम महाजन, तसेच सर्व विभाग प्रमुख डॉ ए.एम.पाटील, डॉ डी.ए.वारके , प्रा. डी.आर.पाचपांडे, प्रा. वाय.आर.भोळे, प्रा. के.एस. भगत, प्रा मोहिनी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत