सावदा येथील केळी व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी हरियाणातून एकाला अटक
सावदा येथील केळी व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी हरियाणातून एकाला अटक
लेवाजगत न्युज सावदा :- येथील केळीचे व्यापारी रितेश संतोष पाटील यांनी 21 लाख रुपये किमतीची केळी हरियाणा येथील व्यापारी जयप्रकाश नारायण गुप्ता राहणार कुंडली बॉर्डर हरियाणा यांना विकली होती.
केळीच्या बदल्यात पैसे न देता आरोपीने सदर व्यापाऱ्याला धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत दाखल केल्यानंतर तो वटला नाही व बाउंस झाला बाउन्स झाल्यानंतर तक्रारदार रितेश पाटील यांनी रावेर कोर्टात दाद मागितली होती. यावेळी कोर्टाने आरोपीविरुद्ध पकड वॉरंट जारी केले होते.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक फौजदार बशीर तडवी व पोलीस हवालदार सिकंदर तडवी असे पथक हरियाणा पाठवून सदर आरोपीचा शोध काढून त्यास शिताफिने जेरबंद केले आहे.
सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास जळगाव येथील सब जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.
केळी व्यापाराच्या प्रकरणामध्ये प्रत्येक शेतकरी ट्रान्सपोर्ट चालक यांनी ओळखीच्या व विश्वासातील व्यापारी यांच्याशी केळीची देवाण-घेवाण करावी ज्या व्यापाऱ्यांशी व्यवहार करीत आहेत त्यांची खातर जमा करावी त्यामुळे फसवणुकीचे प्रकार टाळता येतील असे आवाहन सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत