Header Ads

Header ADS

सावदा येथे नाभिक समाजातर्फे संत शिरोमणी श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न


  सावदा येथे नाभिक समाजातर्फे संत शिरोमणी श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

लेवाजगत न्युज सावदा:-सावदा येथे आज नाभिक समाज तर्फे संतशिरोमणी श्री संतसेना महाराज पुण्यतिथि निमित्त सावदा नाभिक समाजसेवा प्रतिष्ठान या नाभिक समाज संस्थेने प्रतिमा पूजन व स्नेहभोजनचा कार्यक्रम आयोजित केला होता.

 सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सावदा नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र चौधरी हे होते. व  प्रमुख अतिथि सावदा पो. स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री विशाल पाटील साहेब,सहायक पोलिस निरीक्षक

 गर्जे साहेब सावदा हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश भालेराव सर, श्री जगदीश बढे , अजय भारंबे , पंकज येवले, अतुल नेहते , शाम पाटील ,रावेर तालुका शिवसेना अध्यक्ष श्री गणेश शेट्टी , महिला अध्यक्ष सौ ज्योति सापकर , सौ रेखा वानखेड़े ,श्री राजुदादा कोल्हे ,सुरेश ठाकरे हे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सावदा नाभिक समाज सेवा प्रतिष्ठान च्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले नंतर श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगताने मार्गदर्शन केले.


अभिजीत चांदवे याने सपत्नीक सेना महाराज यांची आरती केली व अश्या प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश सापकर सर यांनी केले आणि सुरेश ठाकरे यांनी आभार व्यक्त केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सावदा नाभिक समाज अध्यक्ष श्री सतीष महाजन, उपाध्यक्ष युवराज सापकर, सचिव युवराज इंगळे , सहसचिव किरण येवले, सदस्य महेंद्र सापकर, प्रकाश सापकर ,मिलिंद सापकर महेश सापकर, प्रकाश चांदवे 

रविंद्र सापकर तसेच सर्व सावदा नाभिक समाज बंधु आणि भगिनी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.