Header Ads

Header ADS

नेपाळ दुर्घटनेतील मृतांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत वरणगाव तळवेलला पोहोचण्याची शक्यता

 

Nepal-accident-dead-bodies-likely-to-reach-Warangaon-Talwella-today-evening

नेपाळ दुर्घटनेतील मृतांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत वरणगाव तळवेलला पोहोचण्याची शक्यता 

लेवा जगत न्यूज भुसावळ- नेपाळमधील काठमांडू कडे जाणाऱ्या भुसावळ वरणगाव परिसरातील २७ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतदेह अंबु खैरणी व काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबई व तेथून वरणगाव तळवेल येथे आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान शनिवारी  सायंकाळपर्यंत सर्व मृतदेह पोहोचतील अशी माहिती तहसीलदार नेता लबडे यांनी दिली.




   नेपाळमधील पोखरा येथून काठमांडू कडे जाणाऱ्या भाविकांची एक लक्झरी दरीत कोसळून अपघात झाला यातील काही पार्थिव अबू खैरानी येथील रुग्णालयात  उपचारासाठी काठमांडू येथे  हलविल्याने तेथील रुग्णालयात आहे. या सर्वांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी भारतीय दूतावाचा कडून प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या तातडीने पीएमओ कार्यालयातून परवानगी घेऊन काठमांडूकडे रवाना झाले आहेत. छत्रपती संभाजी नगरातून विमानाने दिल्ली व तेथून काठमांडूला त्यावर रवाना झाल्या. बहुतांश मृत हे वरणगाव तळवेल परिसरातील आहे. दरम्यान मृतांचे पार्थिव विमानाने राहत्या गावी आणण्याची प्रक्रिया रात्री पूर्ण झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. तर गावांमध्ये स्थानिक पातळीवर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या दुर्दैवी घटनेनंतर भुसावळ सह जिल्हाभरात शोक संवेदना व्यक्त होत आहे.


विमानाने नाशिकपर्यंत मृतांना, जखमींना आणणार

     जिल्ह्यातील मृत व जखमी यात्रेकरूंना नेपाळवून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे विमानाने त्यांना नाशिक येथे आणण्यात येणार आहे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत या चक्रींचे मृतदेह व जप यांना नाशिकला आणण्यात येणार आहे तेथून नाशिक येथील प्रांत अधिकारी व भुसावळ प्रांताधिकारी मृतदेह व जखमींना मुसळ येथे शासकीय वाहनांनी अंतिम मृतांचा आकडा २७ असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापक विभागा कडून  मिळाली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.