Header Ads

Header ADS

नेपाळमधील दुर्दैवी बस अपघातात जखमी झालेल्यांची उपमुख्यमंत्र्यांनी घेतली भेट


 

नेपाळमधील दुर्दैवी बस अपघातात जखमी झालेल्यांची उपमुख्यमंत्र्यांनी घेतली भेट


लेवाजगत न्युज जळगाव:- नेपाळ येथे झालेल्या दुर्दैवी बस अपघातातील 7 जखमींना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी या जखमींची महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन विचारपूस केली. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते. 

या 7 जखमींपैकी तिघांवर उद्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा त्यांना भेटून व्यक्त केल्या.


उद्या आणखी 4 जखमींना मुंबईत आणण्यात येणार असून, त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. 


 राज्य सरकारतर्फे या सर्व जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, विधी व न्याय विभागांतर्गत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत यासाठी संपूर्ण समन्वय ठेवला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.