Header Ads

Header ADS

राष्ट्रीय खेळ दिवस

 

National-Sports-Day

राष्ट्रीय खेळ दिवस

ऑलम्पिक क्रीडा महोत्सवात अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होतात. ज्यामध्ये स्वर्ण पदक विजेत्यांची एक वेगळी ओळख असते. आज हॉकीचे क्रीडापटू मेजर ध्यानचंद सिंह जीं चा जन्मदिवस आहे. ते महान क्रीडापटू होते. सन १९२८,१९३२ आणि १९३६ मध्ये त्यांनी भारताकरीता हॉकी क्षेत्रात ऑलंपिकचे सुवर्णपदक जिंकले. म्हणून आजचा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.

स्वर्णपदक विजेत्यांच्या जीवनाचे निरीक्षण केले तर, त्यांच्या वैयक्तिक जीवनाला आत्मसात केले तर, आपण आध्यात्मिक क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त करू शकतो. त्यांचे गुण खालील प्रकारे आहेत.




संपूर्ण लक्ष आपल्या ध्येयाकडे: ऑलम्पिक विजेत्यांचे लक्ष आपल्या ध्येयाकडे केंद्रित असते, तेव्हाच ते त्यात निपुणता प्राप्त करू शकतात. अशी निपुणता त्यांना निरंतर दैनिक अभ्यासानेच प्राप्त होते.

खुमारी आणि उत्साह:  ते दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या प्रतिभेने खूप उत्साहीत असतात. त्यांचा असाच प्रयत्न असतो की, आपल्या कौशल्यामध्ये अधिकाधिक सुधार व्हावा. ते या सरावाला कोणत्याही प्रकारचे ओझे समजत नाहीत. परंतु त्यांचा हा उत्साह आणि जोश त्यांना खेळ खेळण्यांमध्ये प्रसन्नता देतो.

वेळेचा सदुपयोग :  ते अधिकाधिक वेळ आपली कामगिरी सुधारण्यात खर्च करतात. ते व्यायाम शाळेत सर्वप्रथम जातात आणि सर्वांच्या शेवटी परत येतात. बऱ्याच वेळा असे पाहिले गेले आहे की, ते अर्ध्या रात्री सुद्धा सराव करताना आढळतात. एवढेच नव्हे तर, आपल्या सुट्टीमध्ये सुद्धा ते सराव करतात. ते आपल्या खेळण्यांमध्ये मग्न असतात. जेवढा वेळ ते सरावासाठी देतात तेवढाच त्यांना सुखद परिणाम प्राप्त होतो.

शिस्तप्रियता : त्यांच्या यशाचे रहस्य त्यांचे शिस्तप्रिय जीवन असते. त्यांचे प्रशिक्षक त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुचना देतात. ते  आपल्या सरावाची  आणि आरामाची वेळ सुद्धा ठरवितात. त्यांनी किती वेळ झोप घेतली पाहिजे ही सुद्धा त्यांची शिस्त असते. त्यांचे मित्र जेव्हा पार्टीचा आनंद घेत असतात तेव्हा ते झोपलेले असतात, ही खास बाब आहे.  चांगले परिणाम प्राप्त करणे हे त्यांच्या दिनचर्येचे ध्येय असते.

अभ्यासाकरिता वेळ निश्चित करणे हा देखील त्यांच्या शिस्तीचाच एक भाग असतो.

इतरांऐवजी स्वतःच्या यशावर ध्यान केंद्रित करणे :  ते इतरांची सफलता किंवा असफलता किंवा अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यांचे ध्यान सदैव आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यामध्ये असते. म्हणूनच ते सर्वश्रेष्ठ असे आपले कौशल्य दाखवू शकतात.

निरंतर अभ्यास :

जर आपण सुवर्णपदक विजेत्यांच्या जीवनावर दृष्टी टाकली तर, कित्येकदा आपणांस हे समजते की ते अनेक अडचणी सहित निरंतर अभ्यास-सराव करतात. त्यांना कधी शारीरिक त्रास  असो,  कधी भावनिक,जरी कधी इतरांकडून त्यांची आलोचना केली जात असो किंवा त्यांना पैशाची फारच नड(कमतरता) का असेना,या सर्व परिस्थितीत ते त्यांच्या सरावापासून मागे सरत नाहीत. या सर्वं अडचणी त्यांना पुढे जाण्यापासून रोखत नाहीत. ते त्वरित मैदानात उतरतात. आपण त्यांना फ्लू, सर्दी,ताप असे काहीही असो तरी सराव करताना पाहतो. ते बाह्य कठीणता असली तरीही आपले लक्ष आपल्या उद्देशावर केंद्रित करतात व प्रत्येक परिस्थितीत निरंतर सराव करतात.

अपयशामध्ये निर्भय:

ते नेहमी आपल्या अपयशातून बोध घेतात. जरी प्रथम ते जिंकले नाहीत तरी, पुन्हा-पुन्हा ते प्रयत्न करतात, ते हरण्याला  एक आवाहनाच्या रूपात स्वीकारतात आणि प्रत्येक वेळी पहिल्या पेक्षा अधिक मेहनत करतात.आपल्या अपयशाला ते आपल्या ध्येयामध्ये येऊ देत नाहीत.

ध्यानाप्रती एकाग्रचित्त:

त्यांच्यामध्ये एकाग्र होण्याचे विशेष सामर्थ्य असते. आपल्या निपुणतेचे प्रदर्शनापूर्वी ते आपल्या ध्यानाला एकाग्र करतात. प्रदर्शनासमयी ते आपले ध्यान त्याच बाबींवर केंद्रित करतात, जे त्यांना करायचे असते.

   अध्यात्मिक ध्येयाच्या प्राप्ती करीता एका ऑलंपिक विजेत्याच्या गुणांना ग्रहण करणे:    

जे गुण ऑलम्पिक स्पर्धेच्या सुवर्ण विजेत्या मध्ये असायला हवेत, तेच गुण सर्व संतांमध्ये आपल्याला दिसून येतात. ते ध्यान-अभ्यास आणि अध्यात्माचे विजेते असतात. त्यांनी आपल्या जीवनाच्या ध्येयाला म्हणजेच, 'स्वतःला ओळखणे आणि परमात्म्याला प्राप्त करणे' यांस प्राप्त केलेले असते.

   त्यांचे जीवन एका ऑलम्पिक सुवर्ण विजेत्या च्या सर्व गुणांना प्रतिबिंबित करते, जे त्यांना सुवर्णपदक प्राप्त करून देते. जर आपण त्यांच्या जीवनाच्या या दृष्टिकोनाचे निरीक्षण केले तर आपणास जीवनाचा एक आलेख मिळेल जो आपणास ध्यान-अभ्यास व अध्यात्मामध्ये सुवर्णपदक प्राप्ति करिता आवश्यक आहे.

    ध्यान अभ्यास व आध्यात्मिक क्षेत्रांमध्ये आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती सुवर्णपदक जिंकू शकतो. हे प्रत्येक चार वर्षानंतर होणाऱ्या ऑलिंपिक पुरतेच मर्यादित नाही तर, आपण अध्यात्माच्या या ऑलम्पिक मध्ये कधीही भाग घेऊन सुवर्णपदक प्राप्त करू शकतो. तर प्रश्न असा आहे की आपण वाट का पाहतो? आपणही घरात या ध्यान अभ्यासाद्वारे ऑलिंपिक मध्ये सुवर्णपदकाला प्राप्त करूया. म्हणजेच,आपल्या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन घडवूया.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.