धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे राष्ट्रीय संशोधन कार्यशाळा
धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे राष्ट्रीय संशोधन कार्यशाळा
लेवाजगत न्यूज फैजपूर: फैजपूर येथिल तापी परीसर विद्या मंडळ द्वारा संचालित, धनाजी नाना महाविद्यालय येथे दिनांक ३०/०८/२०२४ शुक्रवार रोजी "एकदिवसीय राष्ट्रीय संशोधन कार्यशाळा" चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेसाठी उद्घाटक म्हणून आमंत्रित डॉ.एस.टी.इंगळे प्र.कुलगुरू,कबचौ उमवि जळगाव, यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून संशोधनासाठी आवश्यक विविध विषयांवर डॉ.बी.वी.पवार माजी प्र.कुलगुरू व संचालक,आयएमआर.कॉलेज,जळगाव, प्रा.डॉ.प्रशांत वारके, प्रा.डॉ.प्रशांत देशमुख या मन्यवरांचे मार्गदर्शन लाभणा आहे.
या कार्यशाळेत देशभरातील संशोधक, पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी.चे विद्यार्थी, प्राध्यापक, यांच्यासह संशोधना विषयी तांत्रिक बाबी जाणून घेण्यासाठी इच्छुक असलेले इतर नागरिक सुद्दा सहभागी होऊ शकतात. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी महवियलयात प्रत्यक्ष किंवा youtube लिंक द्वारे (ऑनलाईन) हजर राहू शकतात. परंतु त्यासाठी आपणास खाली दिलेल्या लिंक वर आपले नाव नोंदने आवश्यक आहे:
https://forms.gle/5Q22k9LfsFjFcVhr5
https://forms.gle/5Q22k9LfsFjFcVhr5
या लिंक चा वापर करून आपणास सहज सहभागी होता येईल अशी माहिती कार्यशाळेचे संयोजक डॉ.सविता वाघमारे यांनी दिली आहे. तरी सर्व सहभागिंनी त्यादिवशी सकाळी ०९:०० वाजता धनाजी नाना महाविद्यालय,फैजपुर, कॉन्फरन्स हॉल येथे प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सअप गृप वर दिलेल्या youtube live लिंक नुसार ऑनलाईन उपस्थित राहावे. सर्व ऑनलाईन व ऑफलाईन सहभागिंसाठी प्रमाणपत्र दिले जाईल.या बहुमूल्य कार्यशाळेची फी फक्त १००/रु ठेवण्यात आलेली आहे. तसेच प्रत्यक्ष हजर राहणाऱ्या सर्वांसाठी दोन वेळ चहा,नाष्टा व दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत