Header Ads

Header ADS

नार - पार - गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी खान्देशात जनआंदोलन उभारणार - विकास पाटील



 नार - पार - गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी  खान्देशात जनआंदोलन उभारणार -विकास पाटील 

कल्याण: (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी -सुनिल इंगळे )संपुर्ण महाराष्ट्र जलसंपन्न व जलसमृध्द करणेसाठी सरकार  कटिबद्ध व वचनबद्ध आहे.पण मग खान्देशवर अन्याय का असा संतप्त सावल उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी विचारला.

उत्तर महाराष्ट्रासाठी  खान्देशसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या नार - पार - गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधी कमालीचे उदासीन का ? दुर्लक्ष करण्याचं नेमकं कारण काय ? असे जल परिषद कार्याध्यक्ष एन एम भामरे यांनी विचारला.

 उर्वरित प्रकल्पांसाठी लाखो करोड रुपयाचा निधी उभारण्यासाठी राज्य सरकार तत्पर,सजग व सतर्क मग उपरोक्त  प्रकल्पासाठी नकारात्मकता का? हे न उलगडणारं, न उमगणारं कोडं आहे...! 




नाशिक जिल्ह्यातील नार-पार चं खोरं हे अतीवृष्टीचं खोरं आहे तर गिरणा खोरं हे अतीतुटीचं खोरं आहे.नार,पार, तान,मान,अंबिका व दमणगंगा अशा १९ पश्चिम वाहिनी नद्यांचं सुमारे १४७ टीएमसी अरबी समुद्रात वाया जाणारं पाणी नैसर्गिक  वळण बंधारे,धरणे व बोगदे तयार करुन  किमान ५० टीएमसी पाणी पुर्व वाहिनी गिरणा,मोसम, पांझरा व  बोरी नदीकडे वळविल्यास उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,धुळे,जळगांव नंदुरबार या  चार जिल्हे  कायमचे जलसमृद्ध,जलसंपन्न,दुष्काळमुक्त, टँकरमुक्त व आत्महत्यामुक्त होतील.शेतीसाठी,पिण्यासाठी व उद्योगासाठी पाणी मिळेल. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील व तरुणाईचं स्थलांतर थांबेल...!

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प  खान्देशचे सुपुत्र तथा केंद्रीय जलशक्ती मंत्री मा.ना.श्री.सी.आर.पाटील यांनी व्यवहार्य नाही म्हणून रद्द करणे अतार्किक,अनाकलनीय व अन्यायकारक आहे.हा प्रकल्प न झाल्यास उत्तर महाराष्ट्राचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.मग पुढची पिढी आपणांस कधीही माफ करणार नाही.उत्तर महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करणेसाठी राज्य सरकारने व   स्थानिक लोकप्रिनिधींनी केंद्राकडे यशस्वी,अभ्यासपूर्ण व आग्रही पाठपुरावा करावा.ही विनंती.प्रसंगी राज्य सरकारने स्वतःच्या  हिमतीवर वॉटर बाँड अर्थात कर्जरोखे यांच्या माध्यमातून निधी उभारावा.समृद्धी महामार्ग व मेट्रो प्रकल्पाच्या धरतीवर वा जागतिक बँकेकडून कर्ज उभारावे पण नार -पार - गिरणा नदीजोड पूर्ण करावा अन्यथा खान्देशात मोठ जन आंदोलन सुरू करावे लागेल प्रकल्पांसाठी शासनाने आग्रही व आक्रमक राहणं गरजेचं आहे.अन्यथा नार पारची लढाई आर पार लढू असेही उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे अध्यक्ष विकास पाटील म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.