Header Ads

Header ADS

बदलापूर येथे झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महेश सावंत आणि संजय भगत यांनी शाळांना दिले निवेदन

 

Mahesh-Savant-and-Sanjay-Bhagat-gave-reports-to-schools-taking-in-mind-of-the-seriousness-of-the-incident-at-Badlapur.

बदलापूर येथे झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महेश सावंत आणि  संजय भगत यांनी शाळांना दिले निवेदन                                      

उरण (सुनिल   ठाकूर )- बदलापूर येथे झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विभाग क्रमांक १० चे विभागप्रमुख श्री. महेश सावंत व शाखा क्रमांक १९३ चे शाखाप्रमुख श्री.संजय भगत यांनी  शाळेत साफसफाईला असणारे  कर्मचारी, सुरक्षा रक्षक, शिपाई यांची नावे , फोटो तसेच ठेकेदारांचे नाव व फोन नंबर  फलकावर असावेत (नवीन कर्मचारी आल्यास विद्यार्थी व पालकांच्या निदर्शनासही येऊ शकेल) या संदर्भात आज विभागातील प्रभादेवी महानगरपालिका शाळा क्रमांक २, तसेच आदर्श इंग्लिश हायस्कूल या शाळांना भेटी देऊन मुख्याध्यापकांना निवेदन दिले  व विनंती पत्र देऊन शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा शब्द दिला.




     शाळेतील प्रशासनाने दोन दिवसात वरील कामगारांची संपूर्ण माहिती फलकावर लावली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी विधानसभा उपसंघटक सूर्यकांत बिर्जे ,उपविभाग संघटिका रेखा देवकर, शाखा संघटिका कीर्ती मस्के, छत्रपती पुरस्कार विजेते तारक राऊल, ज्येष्ठ शिवसैनिक रवी गजने, अनिल नागवेकर युवा सेनेचे साहिल कदम, तन्मय विलनकर तसेच अक्षय सुर्वे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.