Header Ads

Header ADS

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्रधारकांसाठी आवाहन

 



महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती  योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्रधारकांसाठी आवाहन

लेवाजगत न्यूज जळगाव , दि. 14 :-  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती  योजना – 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या ( विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या ) परंतु आधार प्रमाणिकरणे न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा-आयटी यांनी दिनांक 12 ऑगस्ट, 2024 ते 7 सप्टेंबर, 2024 पर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या कालावधीत संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. त्याबाबतचा लघु संदेश शेतकऱ्यांना महा-आयटी मार्फत देण्यात आला आहे. सदर योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड तात्काळ प्रमाणिकरण करुन घ्यावे  असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.