जळगावला येथे नेपाळ बस दुर्घटनेतील शव दाखल मंत्र्यांसह जिल्हाधिकारी घटनास्थळी नातेवाईकांच्या ताब्यामध्ये मृतदेहाची ओळख पटल्यानंतर देणार
जळगावला येथे नेपाळ बस दुर्घटनेतील शव दाखल मंत्र्यांसह जिल्हाधिकारी घटनास्थळी
नातेवाईकांच्या ताब्यामध्ये मृतदेहाची ओळख पटल्यानंतर देणार
लेवाजगत न्यूज जळगाव -नेपाळ येथील बस दुर्घटनेतील २५ मृतदेह विशेष एअर अॅम्बुलन्सने जळगाव विमानतळावर दाखल झाले आहे. या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ,जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे यांच्यासह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी हे विमानतळावर दाखल झाले आहेत.
गोरखपूर येथून विशेष विमानाने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे हे २५ शव आणि चार ते पाच जखमी नागरिकांना घेऊन जळगाव विमानतळावर दाखल झाले आहेत. विमानतळावर २५ विशेष रुग्णवाहिका दाखल असून सोबत आरोग्य पथकही दाखल झाले आहे. आरोग्य पथकामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, मोहाडी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनवणे, डॉ. विजय कुरकुरे, यांचा समावेश आहे.
विमानतळावर भुसावळ तालुक्यातील सर्व मयत भाविकांचे नातेवाईक मोठा संख्येने उपस्थित झाले आहेत.
ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यामध्ये मृतदेह देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. बस दुर्घटनेतील पहिल्या बसमधील सर्व भाविक सुखरूप असून त्यांना गोरखपूर येथून विशेष रेल्वेने जळगाव येथे आणण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडून मिळाली आहे.
दुःखद घटना
दिवशी २२ऑगस्टला पोखरा येथे होते तेथून शुक्रवारी २३ ऑगस्ट सकाळी सर्व भाविक दोन लक्झरी बस मधून आणि मालवाहू गाडी घेऊन काठमांडू कडे निघाले त्यापैकी युपी ५३एफ.टी. ७६२३ या बस मध्ये चालक मुस्तफा खान व क्लीनर रामजीत असे मिळून४३ प्रवासी होते ही गाडी मागे तर उर्वरित दोन गाड्या काठमांडूच्या दिशेने पुढे जात होत्या दरम्यान मागे असलेली व मुस्तफा खान चालवत असलेली गाडी साईट पट्टीवरून चाक घसरल्याने खोल दरीतून थेट मत्स्यइदी नदीत कोसळली अवघ्या काही क्षणात झालेल्या अपघातामुळे प्रवाशांना बचावायची काहीही संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत भाविकांचा करून अंत झाला.
अशी आहेत मृतांची नावे सुहास प्रभाकर राणे ४५, सरला सुहास राणे ४१ राहणार तळवेल चंदना सुहास राणे १९, मंगला विलास राणे ४५, नीलिमा सुनील धांडे ५७, तुळशीराम बुधो तायडे ६५, सरला तुळशीराम तायडे ६०, सुधाकर बळीराम जावळे ६०, रोहिणी सुधाकर जावळे ५१, सागर कडू जावळे ३२, विजया कडू जावळे ६०, भारती प्रकाश जावळे ६०, नीलिमा चंद्रकांत जावळे ४६, संदीप राजाराम सरोदे ५०, पल्लवी संदीप सरोदे ४३, गणेश पांडुरंग भारंबे ४०, सुलभा पांडुरंग भारम्बे ६०, मीनल गणेश भारंबे परी गणेश भारंबे ६, पंकज भागवत भंगाने ४४, अनिता अविनाश पाटील ४४, अनुप यमराज सरोदे २८, सरोज मनोज भिरड ५४, प्रकाश दत्तू सुरवडे ५२, आशा समाधान बाविस्कर,मुरतुजा खान बस चालक, रामजीत मुन्ना क्लीनर दोन्ही राहणार गोरखपूर उत्तर प्रदेशचे मृत आहेत. तर गोकर्णी संदीप सरोदे बेपत्ता आहे .
चार परिवारातील १३ जणांवर काळाने घाला घातला.यात वरणगाव येथील माजी नगराध्यक्ष रोहिणी सुधाकर जावळे माजी नगरसेवक सुधाकर बळीराम जावळे नातेवाईक सादर कडू जावळे विजयाकडे जावळे भारती प्रकाश जावळे या पाच जणांचा समावेश आहे यापैकी सुधाकर व रोहिणी हे पती-पत्नी होते
वरणगाव येथील सरोदे कुटुंबातील संदीप राजाराम सरोदे पत्नी पल्लवी आणि पुतण्या अनुप तिघे दगावले. सुलभा पांडुरंग भारंबे,गणेश पांडुरंग भारंबे,मीनल गणेश भारंबे आणि परी गणेश भारंबे हे चार तर तळवेल येथील सुहास प्रभाकर राणे पत्नी सरला राणे यांचाही मृत्यू झाला एकूण२७ मृतांमध्ये १६ महिला तर ११ पुरुष आहेत.
मृतांमध्ये राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी
दुर्घटनेमध्ये ठार झालेले माजी नगरसेवक सुधाकर जावळे हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक होते ते दीर्घकाळ भाजपचे भुसावळ तालुका अध्यक्ष होते त्यांनी खडसे सोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यांच्या पत्नी रोहिणी जावळे व वरणगावच्या माजी सरपंच नगरसेवक होत्या तर भुसावळ पंचायत समितीच्या माजी उपसभापती अनिता अविनाश पाटील राहणार दर्यापूर तालुका भुसावळ यांचाही अपघातात मृत्यू झाला तसेच वरणगाव आयुध निर्माणी क्रेडिट सोसायटीचे संचालक पंकज भागवत भंगाळे यांचा मृत्यू झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत