बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त,बहिणाबाईंच्या कविता वाचन स्पर्धा २०२४ चे आयोजन सहभागी होण्याचे आवाहन
बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त,बहिणाबाईंच्या कविता वाचन स्पर्धा २०२४ चे आयोजन सहभागी होण्याचे आवाहन
लेवाजगत न्यूज सावदा - बहिणाबाई साहित्य परिषद, डोंबिवली, (मुंबई)आयोजीत बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त ,बहिणाबाईंच्या कविता वाचन स्पर्धा २०२४ चे दोन गटात आयोजन स्पर्धाकांनी सहभागी व्हावे.
स्पर्धेसाठी वयोगट खालील प्रमाणे आहे-
गट- अ :१२ ते २५ वर्षे
गट- ब : २६ ते पुढील
कविता वाचन स्पर्धा-
रविवार, दि. २५/०८/२०२४ या दिवशी घेण्यात येणार आहे.
वेळ - संध्याकाळी ०६ .०० वाजेपासून.
स्पर्धेसाठी आपले नाव व कवितेचे नाव दिनांक २३ ऑगस्ट २०२४ पर्यंत खालील दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकांंवर द्यावीत.
झूम लिंक आणि वेळ आपण जॉईन केलेल्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये मिळेल.
स्पर्धेचा निकाल
निकालाची तारीख नंतर कळविण्यात येईल.
स्पर्धेसाठी कविता / गाणी बहिणाबाईंंचीच असावीत.
स्पर्धेचे नियम आणि परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांवर बंधनकारक असेल.
एखाद्या तांत्रिक किंंवा इतर कारणामुळे स्पर्धेेस/निकालास विलंब झाल्यास सहकार्य करावे.
सहभागी स्पर्धकांमधून खालीलप्रमाणे विजेते निवडले जातील.
गट _१
प्रथम क्रमांक
द्वितीय क्रमांक
तृतीय क्रमांक
गट _२
प्रथम क्रमांक
द्वितीय क्रमांक
तृतीय क्रमांक
स्पर्धक प्रतिसादानुसार पारितोषिक कमी-जास्त करण्याचे सर्वाधिकार संयोजन समितीला असतील.
कविता सादरीकरणासाठी वेळ ३( तीन) मिनिटांचा राहील.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क:
१)श्री. लिलाधर महाजन,मो.नं. ९८६७२४९७१८,२)डाॅ. चंद्रशेखर भारती,
मो.नं. ८८२२३३१०१०
स्पर्धेचे सहभाग प्रमाणपत्र तथा विजेत्यांना विजेते प्रमाणपत्र ऑनलाईन पाठवले जाईल याची कृपया नोंद घ्यावी.
अध्यक्ष- किसन वराडे बहिणाबाई साहित्य परिषद, डोंबिवली (मुंबई)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत