शिव उद्योग संघटनेच्या वतीने भांडुप, नेरुळ, बांद्रा आणि चेंबूर येथे सेंट्रल किचनचे उद्घाटन
शिव उद्योग संघटनेच्या वतीने भांडुप, नेरुळ, बांद्रा आणि चेंबूर येथे सेंट्रल किचनचे उद्घाटन
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटना विविध समितींच्या माध्यमातून महाराष्ट्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आपल्या उपक्रमांचा एक भाग म्हणून, शिव उद्योग संघटनेच्या अंतर्गत असलेल्या भोजन समितीने भांडुप, नेरुळ, बांद्रा (पूर्व) आणि चेंबूर येथे सेंट्रल किचनचे उद्घाटन केले आहे.
सेंट्रल किचन मध्ये फक्त भोजन, नाष्टा, चहा इ. तयार करण्यात येणार असून त्याची विक्री करण्याच्या दृष्टीने शिव उद्योग संघटना प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सेंट्रल किचन कार्यरत असलेल्या विभागातील औद्यागिक केंद्र, रुग्णालय, बँक अशा व्यावसायिक ठिकाणी बहुउद्देशीय विद्युत वाहनाच्या सहाय्याने वितरण करणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद, भोजन समिती प्रमुख संतोष आडविलकर, मालमत्ता समिती प्रमुख भालचंद्र डफळ, तसेच केंद्र व्यवस्थापक मंगला लोंढे (भांडुप), रागिणी खामकर (नेरुळ), विमल यादव (बांद्रा) आणि प्रिती बारगोडे (चेंबूर) यांच्यासह विभागातील प्रतिनिधीही उपस्थित होते.
राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि स्वयंरोजगाराला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शिवउद्योग संघटना महाराष्ट्रातील लघुउद्योग आणि उद्योजकांच्या वाढीस पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे, असे उद्गार उद्घाटन प्रसंगी शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद यांनी काढले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत