Header Ads

Header ADS

सावदा येथिल पालिका हायस्कूल मध्ये वरणगाव सिविल सोसायटी मार्फत गुड टच ,बॅट टच' नाटिका सादर

 

Good-Touch-Bad-Touch'-Drama-presented-by-Savada-Yethil-Palika-High-School-Warangaon-Civil-Society

  सावदा येथिल पालिका हायस्कूल मध्ये वरणगाव सिविल सोसायटी मार्फत गुड टच ,बॅट टच' नाटिका सादर

 लेवाजगत न्युज सावदा- येथील श्री.आ.गं.हायस्कूल व श्री.ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालय

येथे बाललैंगिक शोषण यावर आधारित 'गुड टच ,बॅट टच' नाटिका सादर करण्यात आली.

        याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य  पी जी भालेराव ,पर्यवेक्षक श्रीवाय एन पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाटिकेतून वरणगाव येथील सिविल सोसायटी द्वारा  श्रद्धा चौधरी मॅडम (योगाटीचर ) डॉ. अनुजा भोईटे, (डॉक्टर ) नंदिनी माळी, सोनाली पाटील ( सोशल वर्कर) या चार जणींनी 'खिलता बचपन ' ही नाटिका अतिशय उत्कृष्टपणे व विद्यार्थ्यांना सहज समजेल, रुचेल अशा भाषेमध्ये विद्यार्थ्यांसमोर सादर केली.





         विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सुद्धा अतिशय योग्य असा प्रतिसाद देऊन ही नाटिका समजून घेतली .या नाटीकेमध्ये आपल्या आपसातील लोकच कशा पद्धतीने बाल लैंगिक शोषण करतात, मग यामध्ये पुरुष असो अथवा स्त्रिया या सुद्धा समसमान प्रमाणामध्ये या विद्यार्थ्यांचं किंवा लहान मुलांचं लैंगिक शोषण करीत असतात.

       असे विविध प्रसंगाद्वारा ही नाटिका सादर करण्यात आली. 

      प्राचार्य पी.जी.भालेराव यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन  नंदू पाटील यांनी केले व आभार पर्यवेक्षक वाय एन पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.