Header Ads

Header ADS

फैजपूर येथे एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न


 फैजपूर येथे एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न


लेवाजगत न्युज फैजपूर:- दि.30 ऑगस्ट 2024 रोजी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे ‘संशोधन कार्यपद्धती’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.बी.वी पवार माजी-प्र.कुलगुरू, कबचौउमवि जळगाव यांच्या हस्ते झाले व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.एम.टी.फिरके-सचिव,तापी परिसर विद्या मंडळ,फैजपूर यांनी भूषविले, प्रमुख अतिथी संस्थेचे सहसचिव प्रा.एन.ए.भंगाळे, प्रमुख वक्ते प्रा.आर.पी.भावसार, संयोजन समिती चे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळडे तसेच उपप्राचार्य डॉ.एच.जी.नेमाडे, डॉ.एम.झेड.सुरवाडे, डॉ.कल्पना पाटील, कार्यशाळेच्या संयोजिका डॉ.सविता वाघमारे मंचावर उपस्थित होते.


 प्रसंगी उद्घाटक डॉ.बी.वी.पवार यांनी संशोधन प्रस्तावाचे सादरीकरण आणि सर्वेक्षण या विषयावर मार्गदर्शन केले व संशोधन करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय या विषयी सविस्तर माहिती दिली. पहिल्या सत्राचे प्रमुख वक्ते डॉ.आर.पी.भावसार यांनी संशोधनाची पद्धती समजावून सांगितल्या तसेच माणूस विज्ञानातून प्रयोग आणि प्रयोगातून विज्ञान ची निर्मिती करत असतो असे ही मत व्यक्त केले.



अध्यक्षीय भाषणात प्रा.एम.टी.फिरके यांनी संशोधन कार्यपद्धतीच्या महत्त्वावर भाष्य करताना सांगितले की, आधुनिक जग संशोधनाचे जग आहे, मानवी जीवनात उन्नती साधायची असेल तर प्रत्येक विषयावर संशोधन करणे गरजेचे आहे. 

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे यांनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केलं तसेच युवकांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी त्यांची प्रतिभा आणि त्यांचे कसब समाजाला दिशा देणारे ठरावे या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगत कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. कार्यशाळेला देशभरातून ऑनलाईन 354 तर ऑफलाईन 293 असे 600 पेक्षा जास्त संशोधकांनी उपस्थित राहून भरभरून लाभ घेतला. 


दरम्यान दिवसभर चार मार्गदर्शक सत्रे झाली त्यात पहिल्या सत्रात डॉ.आर.पी.भावसार,डॉ.प्रशांत देशमुख,डॉ. प्रशांत वारके यांनी संशोधनाच्या वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच चारही सत्राचे संचलन क्रमशः डॉ.हरीश तळेले, डॉ.वसुंधरा फेगळे, डॉ.जी.जी.कोल्हे, डॉ.सीमा बारी, यांनी सांभाळले.


उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सागर धनगर व आभार कार्यशाळेचे सहसंयोजक प्रा.विजय सोनजे यांनी केले, सायंकाळी सहा वाजता कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. समारोप सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे यांनी उपस्थितांना जीवनात उत्तम संशोधक होण्याचे तत्व सांगितले तसेच संशोधन कार्यासाठी शुभेच्छा ही दिल्या. यावेळी उपस्थित संशोधकांपैकी अनेक जणांनी फक्त शंभर रुपये घेऊन येवढ्या मोठ्याप्रमाणावर व्यवस्था करणारे हे महराष्ट्रातील पहिले महविद्यालय आहे असे मनोगत व्यक्त केले, काहींनी या कार्यशाळेत भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणून आम्ही महाविद्यालय आणि संस्थे कायम ऋणी राहू अश्या भावना व्यक्त केल्या. समारोप सत्राचे सुत्रसंचलन डॉ. सागर धनगर आणि आभार कार्यशाळेचे सहसंयोजक डॉ.रवी केसूर यांनी मानले.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहसंयोजक डॉ.योगेश तायडे, तांत्रिक सहायक डॉ.टी.एम.सावसाकडे, प्रा.एस.पी.मगर तसेच विविध समिती प्रमुख डॉ.मच्छिंद्र पाटील, डॉ.विकास वाघुळदे, डॉ.जयश्री पाटील, डॉ.सरला तडवी, डॉ.एम.के.जाधव, श्री.संतोष तायडे, गणेश चव्हाण, चिराग चौधरी, स्वप्निल हिवरे व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,विद्यार्थिनीं यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.