फैजपूर येथिल खंडेराव वाडीत १४ ऑगष्ट रोजी रानभाजी महोत्सव
फैजपूर येथिल खंडेराव वाडीत १४ ऑगष्ट रोजी रानभाजी महोत्सव
लेवाजगत न्यूज फैजपूर: सातपुडा विकास मंडळ,पाल संचलित, कृषी विज्ञान केंद्र, पाल व तापी परिसर विद्या मंडळ संचलित, धनाजी नाना महाविद्यालय यांच्यात झालेल्या एम.ओ.यू. अंतर्गत रानभाजी महोत्सव दिनांक १४ ऑगस्ट २०२४ सकाळी १०.०० वाजता खंडेराव वाडी फैजपूर येथे. रावेर विधानसभा मतदारसंघाचे सन्मानिय आमदार शिरीषदादा चौधरी व युवा नेते धनंजय भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनात आयोजित केला आहे. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या महोत्सवास आवर्जून भेट द्यावी.
रानभाज्या निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या अतिशय आरोग्यदायी आणि उत्तम अशा भाज्या असल्याकारणाने यांचा आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो आणि त्याच्यामुळे आरोग्य सुधारते व शरीरासाठी आवश्यक असलेले घटक, आवश्यक जीवनसत्व वाढविण्यास मदत होते. म्हणून रानभाज्या आपल्या रोजच्या आहारात असणे आवश्यक आहे. रानभाज्यांचे जीवनात असलेले महत्त्व आणि त्यांचा आपल्या शरीरावर होणारा विघातक परिणाम याविषयी या महोत्सवात माहिती दिली जाणार आहे. या मोहत्सवात जंगलातील विविध रानभाज्यांचे प्रदर्शन व महिला गटांनी तयार केलेल्या रानभाज्या या पाककृतीचा आस्वाद घेता येणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मा. शिरीषदादा चौधरी तसेच राष्ट्रीय काँग्रेस समितीचे युवा नेते धनंजय भाऊ चौधरी व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत