Header Ads

Header ADS

फैजपूर येथिल धनाजी नाना महाविद‌यालयत विशाखा समिती अंतर्गत मूलींसाठी मार्गदर्शन

Faizpur-Yethil-Dhanaji-Nana- Mahavidyalayat-Visakha-Committee-Guidance-for-Internal-Girls


फैजपूर येथिल धनाजी नाना महाविद‌यालयत विशाखा समिती अंतर्गत मूलींसाठी मार्गदर्शन

लेवाजगत न्यूज फैजपूर-येथिल तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना कनिष्ठ महाविद‌यालय येथे, शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मधील विशाखा समिती कार्यक्र‌मातंर्गत दिनांक ६ ऑगस्ट २०२४ या रोजी  मूलींसाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. मार्गदर्शनासाठी डॉ. दिपल पाटील यांना आमंत्रित करण्यात आले. डॉ दिपल पाटील यांनी मुलींचे आरोग्य, मासिक धर्म, व आहार या विषयावर माहिती दिली. त्याच्या मार्गदर्शनात त्यांनी पुढील प्रमाणे  माहीती दिली.




   मासिक पाळीचे चक्र हे २८ ते ३० दिवसांचे असते. मासिक पाळीचे चक्र कसे असते.  त्यामुळे शारीरिक बदल काय होतात.व मासिक पाळी दरम्यान मूलींना होणारे शारिरीक त्रास व त्यावरील घरगुती उपाययोजना हयाविषयी सविस्तर माहीती दिली. मासिक पाळीतील स्वच्छतेचे महत्व त्यांनी सांगितले. 

अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात डॉ दिपल पाटील यांनी प्रश्नोत्तर रूपाने विदयार्थीनीशी संवाद साधत मूलीच्या समस्याचे निराकरण केले.

    तसेच आहारात कॅल्शिअम, प्रोटीन, मॅग्नेशिअम पोटॅशियम युक्त पदार्थाचा आवर्जून समावेश करावा. मैदा व पॅकेट फूड यांना आहारातून वर्ज्य करावे असा मोलाचा सल्ला देखील दिला. कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील मॅडम यांनी भूषविले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.उत्पल चौधरी सर उपस्थित होते.प्रास्तविक  प्रा.कविता भारुडे यांनी केले. सुत्रसंचालन व आभार हे भूमिका परदेशी व संयोगिता राजपूत या वि‌द्यार्थीनीने केले.

तसेच प्रा.तिलोतमा चौधरी, प्रा. अर्चना वराडे , जयश्री सरोदे व पूनम कोल्हे यांचे सहकार्य लाभले.इतर सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.