Header Ads

Header ADS

धनंजयभाऊ चौधरी यांच्या कृतज्ञता संवाद यात्रेची जलपूजन व वृक्षारोपणाने सुरुवात

Dhananjayabhau Choudhary's-gratitude-dialogue-journey-started-with-water-puja-and-plantation-of-trees


धनंजयभाऊ चौधरी यांच्या कृतज्ञता संवाद यात्रेची जलपूजन व वृक्षारोपणाने सुरुवात

लेवाजगत न्यूज रावेर-दि. ७- कृतज्ञता संवाद यात्रे अंतर्गत आज पाचव्या दिवशी युवा नेतृत्व माननीय श्री धनंजय भाऊ चौधरी यांनी आज कर्जत अहिरवाडी आणि मोहगण येथे जनसंपर्क दौरा केला.  या दोऱ्यासाठी  मिळत असलेला प्रतिसाद आणि लोक स्वतःहून या संवाद यात्रेत सहभागी होत आहेत यामुळे या परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.या दौऱ्यानिमित्त  जल है तो कल है या संवेदनेप्रमाणे दादांचे काम सर्वप्रथम जलपूजन करून सुरुवात करण्यात आली.  कर्जत गावात सर्वप्रथम जलपूजन व वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर गावकऱ्यांशी संपर्क साधत असताना गावातील प्रमुख व्यक्तींनी गावांतर्गत जोडणारे रस्ता (कर्जोत अहिरवडी ते नेरूळ)  या रस्त्याची तसेच लहान गावांना जोडणारे पूल या कामांची गावकऱ्यांनी धनंजय भाऊ कडे  मागणी केली त्याचप्रमाणे मा.आमदार शिरीष चौधरी यांनी कर्जत गावासाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ४१ लाख रुपयाची पाईप लाईन, ३० लाख रुपयांपर्यंतचे रस्ते व गटारीचे काम त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळांना रंग-रंगोटीचे काम पूर्ण केलेले आहे. तरी गावातील केर - कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी धनंजय भाऊ यांनी सरपंच कडे  पर्यायी जागा शोधण्याची सूचना केली. त्या दरम्यान धनंजय भाऊ यांनी पंजाब शाह वली व मोहगण येथील दर्ग्याचे फुल व चादर चढवून दर्शन घेतले तसेच या कृतज्ञता दौरा निमित्त पुढील गाव अहीरवाडी येथे धनंजय दादांनी भेट दिली असता त्या गावातील गावांतर्गत रस्ते ही समस्या गावकऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडली तसेच माननीय आ.शिरीष दादा चौधरी यांनी या गावासाठी  पेवर ब्लॉक बसवणे गावांतर्गत गटारी असे खूप सारे विकासाची कामे केलेली आहेत. तसेच आज कृतज्ञता दौऱ्याचा शेवट मोहगन या गावी झाला. सदरील मोहगण गावात भेट दिली असता सदरील गावकऱ्यांनी कब्रस्तान साठी जागा मिळवून देण्याची विनं.ती केली नंतर त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गावकऱ्यांनी शिरिष दादांनी केलेल्या कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .    




        कर्जोत गावात जलपूजन  सरपंच विनोद सावळे,आशिष पाठक शफी भाई,शकीत वार्ताहर,मो. शाहिद,मो. शोएब,शेख जमील,मेहरोद्दिन भाई,देवचंद ससाणे व अहिरवाडी येथे जलपूजन 

सरपंच सुनिता चौधरी, नागेश्वर चौधरी, भास्कर वाघ , चेतन चौधरी, राजेंद्र बेंडाळे , आदित्य महाजन, भूषण पाटील, मयूर महाजन, नितीन चौधरी, किरण महाजन, धनंजय महाजन, नजीर तडवी, रशीद तडवी, रोहित तडवी इत्यादी उपस्थितीत करण्यात आले.

मोहगणयेथील विहिरीचे जलपूजन हैदर कलिंदर तडवी, वजीर रमजान तडवी, असलम तडवी, नजीर तडवी, जहांगीर तडवी, फकीरा तडवी, अशरफ तडवी, शकील तडवी, नूर मोहम्मद तडवी, साजिद तडवी, विनोद तडवी, आमीन तडवी, सोहेल तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

वृक्षारोपण कर्जोद  सरपंच विनोद सावळे,शफियोद्दीन शे रफीयोदीन,शकील पत्रकार,मो. शाहिद, मो. शोएब, सतीश पाटील , रईस खा नवाज खा,शकील साहाबोद्दिन,मो.शाहिद,मो. शोएब ,शकील पत्रकार, जमिल भाई. बिस्मिल्ला शफी ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

अहिरवाळी येथे वृक्षारोपण कैलास वाघ, प्रकाश धोंडू तायडे, उदय वाघ, नागेश्वर चौधरी, गोविंदा अटकाळे, मुन्ना पाटील, उखा पठाण, हमीद तडवी, नितीन चौधरी, चेतन चौधरी, मयूर महाजन इत्यादींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आणी मोहगण येथे वृक्षारोपण असलम तडवी, जहांगीर तडवी, हैदर तडवी, रुस्तम तडवी, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

  कर्जोद येथे शब्बीर मुनाफ, बिस्मिल्ला शे. रेहमातुल्ला, सलमान भाई , अब्दुल   मजीद ,सतीश पाटील ,अनिल महाजन ,मनोज पाठक , मो.शोएब शे.रफियोद्दिन, शकील पत्रकार अरविंद पाठक यांच्यासोबत चर्चा झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.