Header Ads

Header ADS

धनंजय चौधरी यांच्या कृतज्ञता यात्रेच्या चौथ्या दिवशी सातपुडा पर्वत रांगेतील गावात संपर्क अभियानात पूर्वजांनी केलेल्या कामाचे स्मरण

Dhananjaya-Chaudhary's-Gratitude-Pilgrimage-Fourth-Day-Remembrance-of-the-work-done-by-the-ancestors-in-the-contact-campaign-in-the-village-of-Satpuda-Mountain-Rangeti


धनंजय चौधरी यांच्या कृतज्ञता यात्रेच्या चौथ्या दिवशी सातपुडा पर्वत रांगेतील गावात संपर्क अभियानात पूर्वजांनी केलेल्या कामाचे स्मरण

लेवाजगत न्यूज रावेर दि.६- पंछी पीए जल ना घटे ,घटे ना सरवर नीर, दान किये कर्म  किये  ऐसे ,ना घटे  पुण्य कहे दास कबीर ..ज्याप्रमाणे पक्षाने पाणी पिले तरी समुद्र आटत नाही, त्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी केलेले पुण्याचे कर्म कधी घटत नाही एक अशा कबीराच्या दोह्या प्रमाणे माननीय धनंजय भाऊ यांनी आपली कृतज्ञता यात्रेला सुरुवात केलेली आहे. यात्रेच्या चौथ्या दिवशी सातपुडा पर्वत रांगेतील आभोडा खु.बु. जुनोने, मंगरूळ ,पिंपरी इत्यादी सातपुडा पर्वत रांगेतील वाड्या वस्ती व आदिवासी गावांमध्ये गावकऱ्यांची संपर्क प्रस्थापित केला .




अभोडा बु. सरपंच अल्लाउद्दीन हैदर यांनी त्यांचे स्वागत केले. चांद शहावली दर्गाचे दर्शन घेऊन युवा नेते धनंजय भाऊ यांनी ग्रामपंचायतीवर गावकऱ्यांची चर्चा केली. यावेळी रावेर पाल रस्ता व पुलाच्या कामाचे महत्त्व धनंजय यांनी समजून घेतले रस्त्याचे काम पावसामुळे रखडले आहे उर्वरित काम लवकरच होईल अशी माहिती धनंजय भाऊ यांनी दिली.अभोडा येथे तरुणांना वाचनालय व जिमची आवश्यकता आहे असे तरुणांनी सांगितले.

आमदार श्री शिरीष दादा चौधरी यांनी पाण्याच्या टाकीचे व पिवर ब्लॉकचे कामे येथे केलेली आहेत .त्याचप्रमाणे रोजगार हमीतून सुद्धा कामे केलेली आहेत .आभोडा ,जुनोने गुलाबवाडी या गावांना जोडणारा पूल लवकरात लवकर करण्याचे गावकऱ्यांनी सांगितले.मंगरूळ गाव पेसामधे समाविष्ट करावे व मंगरूळ केर्हाळा रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करावे. पिंपरी येथे डार्क झोन व संरक्षण भिंती बाबतची समस्या ग्रामस्थांनी मांडली.आपल्या भागातील गावांचा जास्तीत जास्त कसा विकास करता येईल? तरुणांना व महिलांना सामाजिक कार्यात कसे आणता येईल? यासाठी धनंजय भाऊ यांनी महिला प्रशिक्षण व शिक्षण आयोजित केले होते. 

महिलांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी यावर मात करण्यासाठी स्वयंरोजगार कसा आवश्यक आहे? याबद्दल मार्गदर्शन करताना धनंजय भाऊ यांनी वेगवेगळे उद्योग वाती मेणबत्ती पापड लोणचे साड्यांपासून कपडे असे अनेक उद्योग सुचवले व मुलांनी शिक्षण घेऊन त्यांना वाईट सवयी लागू नये यासाठी रोजगार कसा निर्माण करता येईल' याचे विवेचन त्यांनी केले.महिलांना मार्गदर्शन करताना डॉक्टर नीलम पाटील डॉक्टर; अलका पाटील ;श्री विजय कोळी , भाग्यश्री पाटील, हसीना तडवी,यांनी उद्योगधंदे सुरू करण्यासाठी कशाप्रकारे प्रस्ताव तयार करावा? उद्योग कसे उभे राहावे ? विक्री कुठे व कशाप्रकारे करावी? यासंदर्भात मार्गदर्शन केले  यावेळी गाआपल्या भागासाठी मी सतत प्रयत्नशील राहील; गावाची दशा व दिशा बदलवावी लागेल व त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याची तयारी माननीय धनंजय भाऊ यांनी केली आहे. गावातील घरकुल विधवा मानधन; रेशन कार्ड इत्यादी बाबत येणाऱ्या अडचणींसाठी व त्यांना लवकरात लवकर दाखले मिळण्यासाठी कॅम्प आयोजित केला जाईल; असे अशी माहिती धनंजय भाऊ यांनी दिली. विकासाची परंपरा आपण जतन करूया !व आपला भाग आपल्या आशीर्वादाने विकसित करूया !अशी साद धनंजय भाऊ यांनी घातली. .यावेळी वरील गावांतील जलपूजन पंडित पवार .कादर तडवी.  चांदखा  तडवी .केशर तडवी .सुपडू मिस्तरी .अकबर तडवी .गुलजार तडवी यांच्या हस्ते करण्यात आले .जुनोने येथे दशरथ देहाना ,प्रताप राठोड'चत्रु राठोड रमेश राठोड करतार राठोड प्रमोद वानखेडे ग्रामपंचायत सदस्य इत्यादी उपस्थित होते याप्रसंगी आभोडाा येथे जलपूजन अल्लाउद्दीन तडवी ग्रामपंचायत सदस्य कादर तडवी व चांदखा तडवी

आवळा खुर्द येथे उपसरपंच धनराज पवार, इंदल पवार ईश्वर पवार ,प्रताप राठोड ,जुनोने येथे उपसरपंच रमेश राठोड ग्रामपंचायत सदस्य प्रमोद वानखेडे ,राठोड यांच्या हस्ते 

मंगरूळ येथे सरपंच गुलशन तडवी ,इंदुबाई वासुदेव वानखेडे, रमेश राठोड ,भुरीबाई बारेला अजंता बारेला मनीषा सपकाळे पिंपरी येथे सरपंच सुलतान सलदाार यादव महाजन ,ज्ञानेश्वर महाजन ,अमित तडवी काशिनाथ निकम ,हर्षल महाजन ,सतीश महाजन यांचे हस्ते करण्यात आले.

याचप्रमाणे पूर्वजांच्या स्मृतीं प्रित्यर्थ ग्रामपंचायत आभोळा बुद्रुक येथे सलीम तडवी, अलाउद्दीन तडवी, धनराज पवार, संजू तडवी ,ईश्वर पवार, चांदखा तडवी ,गुलजार तडवी, सुपडू तडवी, आभोडा खुर्द येथे चव्हाण, चिंतामण पवार ,गणेश पवार ,जुनोने येथे चतुर राठोड ,विकास चव्हाण, कैलास रील ,प्रमोद वानखेडे ,मंगरूळ येथे महेंद्र बारेला, किशोर.   पाटील.  मनीषा सपकाळे ,राजू जाधव ,पिंपरी येथे सरपंच सुलतान तडवी,  नबाब तडवी, रज्जाक तडवी ,शिवताल निकम, अश्रफ तडवी ,यासीन तडवी ,हर्षल कापसे, सुमन निकम ,ज्ञानेश्वर महाजन ,सतीश महाजन, अध्यक्ष लीलाधर  महाजन ,पोलीस पाटील विश्वनाथ महाजन, कापसे  यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.