मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेस सावदा शहरात प्रचंड प्रतिसाद"
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेस सावदा शहरात प्रचंड प्रतिसाद"
लेवाजगत न्यूज सावदा-महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबणासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे. महिलांचा यात सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वांतत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वांतत्र्यासाठी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना" सुरु करण्यात आलेली आहे.
सावदा नगरपरिषद मार्फत दिनांक ११जुलै २०२४ पासून नगरपरिषद परिसरातील नगरपरिषद पूरक इमारत व शहरातील इतर ३ ठिकाणी मदत कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षामार्फत साधारण ४००० महिला व मुलींचे मोफत फॉर्म स्विकारून त्या फॉर्मला नारीशक्ती दूत अँप द्वारे ऑनलाईन दाखल करण्यात आलेले आहे.
रावेर तालुक्यातील ४६४२७ अर्ज प्राप्त झाले होते. या फॉर्म ला विशिष्ट कालमर्यादेत स्विकृती द्यायचे असल्याने संपुर्ण रावेर तालुक्यातील एकुण ८००५ फॉर्मला सावदा पालिकेच्या मदत कक्षाकडून स्विकृती देण्यात आलेली आहे.
सावदा शहरातील बचत गट तसेच इतर सर्व समाजघटकातील महिलांनी या योजनेस चांगला प्रतिसाद दिल्याने मोठ्या प्रमाणावर महिलांना योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे.
सदरील कक्षामध्ये तहसीलदार बंडू कापसे साहेब ,मुख्याधिकारी भूषण वर्मा यांचे मार्गदर्शन खाली धिरज बनसोडे,कार्तिक ढाके, आकाश तायडे, महेश इंगळे, विनय खक्के, तेजस वंजारी, राजू मोरे, संदीप पाटील, अमित बेंडाळे व श्रेयस जैन इ. कर्मचारी महिलांना अँप द्वारे फॉर्म भरण्यासाठी मोफत सहकार्य केले.
या अभियानाला उत्कृष्ट पद्धतीने राबविण्यासाठी मा. मुख्याधिकारी भुषण वर्मा साहेव तसेच यांचे वेळोवेळी सहकार्य लाभत आहे.
ज्या महिलांच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आहेत त्यांना जेथून ऑनलाईन अर्ज भरला तेथे जाऊन एडिटचे ऑप्शन येत आहे ,त्यात त्रुटी पूर्ण करून फॉर्म मंजूर होत आहे. .ज्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला आहे त्यांना नवीन भरण्यासाठी अजून कोणतेही ऑप्शन आलेले नाही. फॉर्म नामंजूर झाला किंवा मंजूर झाला याच्याबद्दल प्रत्येकाने दिलेल्या मोबाईल वरती टेक्स्ट मेसेज येत आहे .तरी आपण याची शहनिशा करून घ्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत