Header Ads

Header ADS

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; पंतप्रधान मोदींनी ८ महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण

 

Chhatrapati-Shivaji-Maharaja-statue-collapsed-unveiled-by-PM-Modi-8-months-ago

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; पंतप्रधान मोदींनी ८ महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण

लेवाजगत न्यूज मालवण -नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला आहे. पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप अस्पष्ट आहे.

    



  नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण केलं होते. नौदल दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या कामाबद्दल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुरुवातीपासून चौकशीची मागणी केली होती. या झालेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

  सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेमानंद साळगावकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून वर्ष झाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.