आचार्य बाळकृष्ण यांचा जन्मदिवस जडीबुटी दिवस म्हणून उत्साहात साजरा
आचार्य बाळकृष्ण यांचा जन्मदिवस जडीबुटी दिवस म्हणून उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज कल्याण प्रतिनिधी: पतंजलि योग समिती विभाग कल्याणचे सर्व पदाधिकारी, योगशिक्षक, कार्यकर्ते बंधू भगिनी त्यांचे मार्फत शेणवे, तालुका शहापूर येथे सुमारे १५० आयुर्वेदिक तथा फलोत्पादन देणाऱ्या रोपांची लागवड करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रभारी सतिश मुळावेकर, परमेश्वर जाधव, वंदना कल्याणकर, अनिल पवार, सुनिल इंगळे आणि अब्दुल शेख यांची प्रमुख उपस्थिती होती शहापूर समितीचे तहसील प्रभारी भगवान बोंद्रे, मनोहर मडके, रघुनाथ पडवळ, नजमा शेख, तानाजी भेरे, शेणवे येथील सोनू वरकुटे, गोपाळ सोनावळे व गावकरी यांनी सर्व रोपवनासाठी लागणारे साहित्य व इतर नियोजन यासाठी मदत केली, तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने लावलेली रोपे जगविण्याची हमी दिली.
शहापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्री दर्शन ठाकूर व त्यांच्याकडील वनपाल, वनरक्षक यांनी रोपे उपलब्ध करून दिली. तसेच सर्वांसाठी अल्पोपहाराची सोय केली. मुरबाड समितीचे तहसील प्रभारी प्रतीक शिंगोळे व त्यांचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
चेरवली येथील नदीकाठच्या मठामध्ये सामूहिक वनभोजन करून आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
मठाचे पदाधिकारी श्री भगवान फर्डे यांनी मठाचा इतिहास व आध्यात्मिक मार्गदर्शन करून आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत