Header Ads

Header ADS

ब्रिलिओ नॅशनल स्टेम चॅलेंज २०२३-२४चे आयोजन-पनवेलच्या विठोबा खंडप्पा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजची क्लस्टर राउंडमध्ये बाजी

Brilio-National-STEM-Challenge-2023-24-organization-of-Vithoba-Khandappa-High-School-and-Junior-College-of-Panvel-in-Cluster-Round-Baji





 ब्रिलिओ नॅशनल स्टेम चॅलेंज २०२३-२४चे आयोजन-पनवेलच्या विठोबा खंडप्पा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजची क्लस्टर राउंडमध्ये बाजी 

      उरण (सुनिल ठाकूर ): विठोबा खंडप्पा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज पनवेल आणि श्री सदगुरू वामनबाबा माध्यमिक विद्यालय, घाट येथील विद्यार्थ्यांनी ब्रिलियो नॅशनल स्टेम चॅलेंज २०२४ च्या क्लस्टर राउंडमध्ये विजय मिळवला. या स्पर्धेचे आयोजन ब्रिलिओ या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेस व सोल्यूशन्स पुरविणाऱ्या कंपनीने केले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टेम शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या स्टेम लर्निंग या सामाजिक संस्थेनेही या आयोजनात भाग घेतला.

      क्लस्टर राउंडचे आयोजन राकेश जैन हायस्कूल, शिवकर पनवेल, जिल्हा रायगड येथे करण्यात आले होते. यामध्ये या विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव साजरा करण्यात आला कारण त्यांना स्टेम लर्निंग टीम आणि शिक्षकांनी सन्मानित केले. हे विजेते आता झोनल राउंडमध्ये पुढे जातील, ज्याचा अंतिम उद्देश बेंगळुरूमध्ये २७ ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धा करणे आहे.

      स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) या विषयांमधील विविध उपक्रम यापुढे वर्भभर घेतले जाणार आहेत. त्यांची सुरुवात या स्पर्धेच्या निमित्ताने झाली. यामध्ये विज्ञान आणि गणित मॉडेल स्पर्धा, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांची तोंडओळख यांचा समावेश होता. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, नावीन्य आणि डिझाइन विचारविषयक कौशल्ये वाढवण्याच्या दृष्टीने ही नॅशनल स्टेम चॅलेंज डिझाइन केलेली आहे.

     ‘स्टेम लर्निंग’चे संस्थापक आशुतोष पंडित म्हणाले, “नॅशनल स्टेम चॅलेंजच्या चौथ्या आवृत्तीच्या आयोजनाबद्दल मी रोमांचित आहे आणि या यशस्वी विद्यार्थ्यांना विभागीय फेरीसाठी पुढे जाताना पाहून तितकाच उत्साही झालो आहे. ‘के-ट्वेल्व्ह’ शिक्षण सक्षम बनवण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यास स्टेम लर्निंग समर्पित आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण व्यक्त होण्यास संधी देतो. आमची विज्ञान केंद्रे जिथे स्थापित आहेत, तिथे हे उपक्रम आम्ही राबवितो.”

     स्टेम लर्निंग ही भारतभर स्टेमचे शिक्षणाचा प्रसार करण्यास समर्पित असलेली एक अग्रणी संस्था आहे. देशभरातील ४०००हून अधिक शाळांमध्ये ती काम करते. तसेच, सुमारे ३५० हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कॉर्पोरेट सीएसआर उपक्रमांच्या सहभागातून ‘स्टेम लर्निंग’ने सरकारी शाळांमध्ये विज्ञान केंद्रे, विज्ञान प्रयोगशाळा आणि टिंकर लॅब स्थापन केल्या आहेत. अशा प्रकारे दहा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून, भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि नवोन्मेषकांच्या पुढच्या पिढीला सक्षम बनवण्यासाठी स्टेम लर्निंग योगदान देत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.