Header Ads

Header ADS

भुसावळ तापीकाठ ते फैजपूर १८ ऑगस्ट रोजी भव्य कावड़ यात्रा भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन

Bhusawal-Tapikath-to-Faizpur- 18-August-Bhavya-Kavad- Yatra Devotees invited to participate


भुसावळ तापीकाठ ते फैजपूर १८ ऑगस्ट रोजी भव्य कावड़ यात्रा भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन


लेवाजगत प्रतिनिधी संदीप चौधरी आमोदा-देवादी देव महादेव  यांच्या असीम कृपेने सालाबादप्रमाने दिनांक १८/०८/२०२४ वार रविवार रोजी भुसावल तापी काठा वरिल श्री तारकेश्वर महादेव मंदिर पासून सकाळी ठीक ०७:०० वाजता कावड़ यात्रेला तापी मातेची ओटी भरून व पूजन करून सुरुवात होईल. ठीक ठिकाणी भाविक भक्तां कडून कावड़ धारी भक्तां साठी चाहा व अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कावड़ यात्रेच्या मार्गात लागणाऱ्या गावंमध्ये देखील कावड़ यात्रेच्या स्वागाता साठी मोठा उत्साह आहे. पेपरमिल फाटा, पाडळसा, बामणोद, आमोदा, पिम्परुळ फाटा, तसेच फैज़पुर शहरातील भुसावल रोड, छत्री चौक, सुभाष चौक, श्री राम मंदिर, पेहेड वाडा, मोठे मारुति मंदिर, लक्कड़ पेठ,  रथ गल्ली, न्हावी दरवाजा, श्री विठ्ठल मन्दिर येथून मार्गस्थ होत कावड़ यात्रा श्री खंडेश्वर महादेव मंदिर येथे सम्पन्न होणार असून सार्वजनिक कावड़ यात्रा समिति व सकल हिन्दू समाजा तर्फे भोजन प्रसादीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

चातुर मासातील श्री हरि निद्रासनात असतांना श्रावण महिन्यात सृष्टिचे पालन पोषण महादेवांच्या हाती असते म्हणून पवित्र श्रावण महिन्यात कावड़ पद्धतीने नदी तुन जल आणून महादेवाचे अभिषेक करण्यास विशेष महत्व वेद आणि पुराणात सांगितलेले आहे. तसेच मनोकामना पूर्ण होण्यासाठी विशेष रूपाने भाविक मोठ्या संख्येने कावड़ पद्धतीने जलाभिषेक करण्याचे प्रमाण भाविकांनी दिलेले आहे. तरी कावड़ यात्रेत सहभागी होऊन जास्तीत जास्त पूण्य अर्जन करावे व आपल्या मनोकामना सिद्ध होण्यासाठी महादेवांची प्रार्थना करावी हे आव्हान सार्वजनिक कावड़ यात्रा समिति फैज़पुर व सकल हिन्दू समाजा तर्फे करण्यात आलेली आहे.




महाँकाल सेना श्री रामपेठ यांच्या तर्फे विशेष कावड़ बनविन्यात आलेली आहे तसेच विविध मित्र मंदळांतर्फे देखाव्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

फैज़पुर ते तापी नदी काठ येथे भाविकांना पोहोचविण्या साठी सार्वजनिक कावड़ यात्रा समिति तर्फे सकाळी ०५:०० वाजता सुभाष चौक येथून विविध वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

कावड़ यात्रेत भविकांसाठी सुविधा पुरवण्या साठी व यात्रेच्या सुयोग्य नियोजना साठी पंचक्रोशितील भाविक परिश्रम घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.