बबनराव काकडे यांची नियुक्ती फैजपूर विभाग प्रांत अधिकारीपदी नियुक्ती
बबनराव काकडे यांची नियुक्ती फैजपूर विभाग प्रांत अधिकारीपदी नियुक्ती
लेवाजगत न्यूज फैजपूर-विभागाच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी देवयानी यादव या त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ पूर्ण करून उत्तर प्रदेशातील राज्यातील कॅडरमध्ये बदली झाल्याने हे पद काही दिवसापासून रिक्त होते. या ठिकाणी नेमकी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. अखेर या पदावर उपजिल्हाधिकारी बबनराव काकडे यांची नियुक्ती करण्यात आली असून महसूल व वन खात्याचे उपसचिव महेश वरूडकर यांनी याबाबतचे आदेश निर्गमीत केले आहेत.
बबनराव काकडे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी असून त्यांनी याआधी रावेरचे नायब तहसिलदार ,तहसिलदार म्हणून यशस्वीपणे कारभार सांभाळला होता.कर्तव्यदक्ष व संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची या परिसरात ख्याती आहे. या पार्श्वभूमिवर, त्यांची फैजपूरच्या प्रांताधिकारीपदी झालेली बदली स्वागतार्ह अशीच आहे. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार सांभाळतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत