Header Ads

Header ADS

सावदा शहरातून भोपाल येथील ऑनलाईन फ्रॉड गुन्हयातील आरोपीस पोलीसांनी केले जेरबंद

 

Accused-in-online-fraud-case-filed-in-Madhya-Pradesh-Bhopal-was-arrested-by-the-police-from-the-city

मध्यप्रदेशातील भोपाल येथील ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात दाखल गुन्हयातील  आरोपी सावदा शहरातुन पोलीसांनी केला जेरबंद                        

लेवाजगत न्यूज सावदा-भोपाल क्राईम ब्रॅन्च मध्यप्रदेश येथे दाखल  गुन्ह्यातील ऑनलाईन फ्रॉड / फसवणुक करुन तक्रारदार यांचे ९,३५,०००/-रुपये रकमेची फसवणुक केली आहे. त्या प्रकरणातील भुसावळ येथील आरोपीस सावदा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.




      सदर प्रकरणाची थोडक्यात माहीती अशी की, आरोपी यांनी तक्रारदार यांना शेअरमार्कटचे ॲप मध्ये पैसे गुतवण्याचे आमीष दाखवुन बनावट शेअरमार्केटचे अप्लीकेशन बनवुन त्यात फिर्यादी यांना पैसे गुतवणुक करण्याचे आमीष दाखविल्याने तक्रारदार यांनी शेअरमार्केटचे अप्लीकेशन मध्ये पैशांची गुतवणुक केली होती. कालांतराने सदर ॲप्लीकेशन मध्ये तक्रारदार यांची जमा झालेली रक्कम काढण्यासाठी गेले असता त्यांची फसवणुक झालेचे लक्षात येताच त्यांनी भोपाल क्राईम ब्रॅन्च येथे फसवणुक झाल्याची तक्रार दिलेवरुन गुन्हा नोंद झाला होता. भोपाल क्राईम ब्रॅन्चचे पोलीसांनी तांत्रीक माहीतीचे आधारे बनावट अकाउंट तयार करणारे आरोपीतांचा शोध घेतला असता त्यात आरोपी नामे अनिकेत दत्तात्रय ब-हाटे, रा.भुसावळ याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याने सदर आरोपीताचे ठाव ठिकाण्या बाबत माहीती घेता आरोपी हा सावदा शहरात असल्याची माहीती मिळाल्याने भोपाल क्राईम ब्रॅन्चचे पोलीस पथक हे सावदा पोलीस स्टेशन येथे आले त्यांना  सपोनि विशाल पाटील यांनी त्यांचे अधिनस्त अंमलदार पोहेका.उमेश पाटील, पोहेका.यशवंत टहाकळे, पोका.राजेद्र वैदकर तसेच भोपाळ क्राइम ब्रँच येथील पोलीस उपनिरीक्षक साहू, पोह सेन, पोशी शर्मा, पोशी चौरे यांचे पथकाने गोपणीय माहीती काढुन आरोपी  अनिकेत दत्तात्रय ब-हाटे, रा.भुसावळ यास सावदा शहरातून त्याचे नातेवाईकचे घरातून शिताफीने ताब्यात घेवुन भोपाळ पोलीस यांचे स्वाधीन केले आहे.

   सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि  विशाल पाटील यांचे नागरिकांना आवाहन

     सपोनि  विशाल पाटील यांनी जनतेस ऑनलाईन पैशांचे आमीष दाखविणारे जाहीराती / ॲप्लीकेशन / फोन कॉल्स यांचे भुलथापांना बळीपडु नका, कुठल्याही प्रकरणाची पुर्ण माहीती घेवुन सुरक्षीत पद्धतीने ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा, ऑनलाईन ॲप्लीकेशनची सत्यता पडताळुनच पुढील कारवाई करावी असे आव्हान केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.