Header Ads

Header ADS

वढोदे प्र. सावदा येथिल सर्चलाईट इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये वर्षावास प्रारंभ समारंभ संपन्न!

 

Vadhode-Pr-Savada-Yethil-Searchlight-English-Medium-School-Annual-Commencement-Ceremony-Complete!

वढोदे प्र. सावदा येथिल सर्चलाईट इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये वर्षावास प्रारंभ समारंभ संपन्न!

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सावदा -येथिल'सम्राट फाउंडेशन ' संचलित "सर्चलाइट इंग्लिश मिडीअम स्कूल वढोदे प्र.सावदा" ता.यावल येथे आषाढी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आज २०जुलै २०२४ शनिवार सकाळी ९ वाजता वर्षावास कार्यक्रमाचा शुभारंभ पूजन व सामुहिक वंदन करून करण्यात आला. शाळेतर्फे दिलेल्या माहितीनुसार हा वर्षावास कार्यक्रम पुढील सलग तीन महिने सुरू राहणार आहे. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक, शाळेतील सर्व विद्यार्थी व उपासक दररोज सकाळी ८ वाजल्यापासून पूजा करून "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाचे वाचन व पठण करतील.  याशिवाय या तीन महिन्याच्या वर्षावास काळात शाळेत विविध धार्मिक कार्यक्रमात चर्चासत्र, प्रवचन मालिकाही आयोजित करण्यात येणार आहे.     





    आषाढी पौर्णिमेपासून सुरु होणाऱ्या या वर्षावासाच्या सुरुवातीला वक्ते तथागत गौतम बुद्ध आणि आषाढी पौर्णिमेचे महत्त्व सविस्तरपणे सांगतील आणि उपासकांना पंचशीलाचे पालन करण्याची प्रेरणा मिळेल. यासोबतच विपश्यना (ध्यान), त्रिरत्न वंदना, परित्राणपाठ, धम्मदेसन, उपोसथ विधी आदी धार्मिक कार्यक्रमही या वर्षावास कार्यक्रमात घेण्यात येणार आहेत.

      आजपासून सुरू झालेल्या या वर्षावास सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे  होते. तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणुन बोधाचार्य व केंद्रीय शिक्षक आयु.डी.बी. महाले सर (फैजपूर), आयु.विजय भोसले, धम्मदुत अशोक भालेराव, श्रीहरी कांबळे (तलाठी रायपूर) उपस्थित होते. केंद्रीय शिक्षक व बोधाचार्य यांनी उपस्थित सर्वांना वर्षावास सोहळ्याची माहिती दिली तसेच तथागत गौतम बुद्ध ते आजपर्यंतच्या बौद्ध धर्माच्या प्रवासाचीही ओळख करून दिली. बौद्ध धर्मात त्रिशरण, पंचशील, अष्टांग मार्ग आणि दहा पारमिता यांचे महत्त्व व अर्थ सांगितला. यावेळी मार्गदर्शन करताना बोधाचार्य व केंद्रीय शिक्षक आयु.  डी.बी. महाले सरांनी जीवनातील शीलाचे महत्त्व सांगितले आणि चांगले संस्कार यशस्वी होण्यासाठी कसे मदत करतात हे देखील सांगितले. धम्मदुत आयु.अशोक भालेराव यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा देत मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात बोलताना आयु. श्रीहरी कांबळे यांनी तथागतांनी सुनियोजित केलेला धम्म जेवण जगताना कसा मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आयु. विजय भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलांचे वय लक्षात घेऊन बौद्ध धर्माची आणि वर्षावास कार्यक्रमाची माहिती सोप्या भाषेत देण्यात आली. या कार्यक्रमास विविध सामाजिक कार्यकर्ते, संचालक मंडळ, शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका, उपासक-उपसिका व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.