Header Ads

Header ADS

तब्बल पन्नास वर्षापासूनचा प्रलंबित दावा सामंजस्याने लोक अदालतीत निघाला निकाली -न्यायमूर्ती श्री यादव यांनी केले दोन्ही पक्षकारांसह वकिलांचे कौतुक

 

The-suit-pending-for-over-fifty-years-was-decided-by-judge-shree-yadav-in-the-people-court-conciliation-with-both-the-lawyers-of-the-parties

तब्बल पन्नास वर्षापासूनचा प्रलंबित दावा सामंजस्याने लोक अदालतीत निघाला निकाली

 न्यायमूर्ती श्री यादव यांनी केले दोन्ही पक्षकारांसह वकिलांचे कौतुक

 रावेर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-जमिनीच्या वादावरून वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये सुरू असलेला तब्बल पन्नास वर्षापासून चा वाद अखेर लोक न्यायालयात  दोन्ही पक्षकारांच्या सामंजस्य भूमिकेने वकिलांच्या प्रयत्नाने संपुष्टात आला आहे. न्यायमूर्ती श्री यादव यांनी दोन्ही पक्षकारांच्या भूमिका समजावून घेऊन सदर वाद निकाली काढण्याचे आदेश दिले असून दोन्ही पक्षकारांसह दोघांचे वकील यांचे देखील कौतुक केले. 





 रावेर येथे राष्ट्रीय महालोक अदालतिचे आयोजन करण्यात आले होते या लोक अदालतीत अनेक विविध आपापसातील वाद विवाद तसेच विविध शासकीय आस्थापना यांच्या विवादित प्रकरणांचा जास्तीत जास्त निपटारा व्हावा यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती प्रवीण यादव यांनी भूमिका बजावली

 या लोक अदालती मध्ये रे.मु.न 48/1974  हा दावा वादी रेवा दामू बेंडाळे रा विवरे बु यांच्यासह वगैरे 13 मिळून प्रतिवादी शरद धोंडू तळेकर यांचे विरुद्ध रावेर न्यायालयामध्ये दिनांक 15 मार्च 1974 रोजी दाखल केलेला होता. यावर विविध प्रकारचे वाद प्रतिवाद होत सदर दावा हा उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता परंतु तरीही दोन्ही पार्ट्या न्यायाच्या प्रतीक्षेतच रखडलेल्या होत्या.  सदर दावा दाखल झाला त्यावेळेस असणारे वादींचे वकील श्री फालक यांचा देखील मृत्यू झालेला होता त्यांचे पश्चात वादीतर्फे एडवोकेट संदीप भंगाळे व प्रतिवादीन तर्फे एडवोकेट जितेंद्र दांडगे यांनी कामकाज बघण्यास सुरुवात केली. लोक अदालतीचे महत्त्व लक्षात घेऊन दोन्ही वकिलांनी आपापल्या पक्षकारांशी समुपदेशन करत संवाद साधला, आणि सदर वाद हा सामोपचाराने मिटविण्यासाठी तयार केले. सदर बाबही न्यायमूर्ती श्री यादव यांच्या समक्ष आल्यानंतर  दोन्ही पक्षाचे पक्षकार तसेच वादी प्रतिवादी आणि वकील यांचे कौतुक करत प्रत्यक्ष दोघांची बाजू समजावून घेऊन खात्री करून सदर वाद निकाली काढण्याचे आदेश दिले. यातील वादी रेवा बेंडाळे यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना न्यायालयात येणे शक्य नसल्याने न्यायमूर्ती श्री यादव यांनी न्यायालयाचे परिसरात असलेल्या रिक्षा जवळ जाऊन वादी यांची समक्ष भेट घेऊन संवाद साधला. या घटनेने उपस्थित यांना भारावून आले होते. कारण न्याय देण्यासाठी न्यायालय चालत बाहेर आले होते. आणि निकाल लागल्यावर पन्नास वर्षांपासून हिरमुसलेले चेहरे हास्याने खुलले होते. ऍड श्री भंगाळे, श्री दांडगे, व सहकारी असलेल्या ऍड सुवर्णा रावेरकर यांनी पुढाकार घेतल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

 रावेर येथील लोक न्यायालयात   83 प्रकरणे निकालात काढण्यात आले असून 37, 56, 183 एवढी रक्कम प्राप्त झाली आहे.याप्रकरणी न्यायालयातील अधीक्षक श्री बिराडे श्री इंगळे श्री बारी  श्री ढिवरे यांनी न्यायालयीन प्रक्रियेचे कामकाज पाहिले. तर एडवोकेट व्ही पी महाजन, विपिन गडे,योगेश गजरे, सुभाष धुंदले प्रमोद बिचवे, तुषार चौधरी,  बार संघाचे उपाध्यक्ष डी. ई पाटील, सचिव किशोर पाटील सहसचिव जावेद शेख सरकारी वकील श्रीकृष्ण दुट्टे जितेंद्र दांडगे नितीन चौधरी  सुवर्णा रावेरकर दीपक निळे दीपक गाढे, आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.