Header Ads

Header ADS

गळा आवळून खून, बालकाची ओळख चार दिवसांपासून पटेना

 

The-identity-of-the-child-by-the-throat-is-lost-for-four-days

गळा आवळून खून, बालकाची ओळख चार दिवसांपासून पटेना

वृत्तसंस्था भुसावळ-शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयामागील शेतात १० ते १२ वर्षीय अनोळखी मुलाचा नग्नावस्थेतील कुजलेला मृतदेह १८ जुलैला आढळला होता. या मुलाचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालांअंती समोर आले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.




    साकेगाव शिवारात नवोदय विद्यालयामागील शेताच्या (गट क्र.३१७/१) दक्षिण बांधालगत १० ते १२ वर्षीय मुलाचा कुजलेला मृतदेह गुरुवारी आढळला होता. मृतदेहाजवळ गुलाबी व काळ्या रंगाची पानांची डिझाईन असलेला फुल बाह्यांचा शर्ट, निळ्या रंगाची फुल पॅण्ट आढळली होती. ही माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. पण, शवविच्छेदनानंतर या मुलाचा मृत्यू गळा आळवल्याचे झाल्याचे समोर आले. यामुळे हवालदार संजय भोई यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांत अज्ञात संशयीतावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. तसेच अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलिस जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अपहरण झालेले व हरवलेल्या १० ते १२ वयोगटातील मुलांची माहिती संकलित करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.