Header Ads

Header ADS

ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा रस्त्यात सापडलेला मोबाईल पोलिसांना केला परत


  ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा रस्त्यात सापडलेला मोबाईल पोलिसांना केला परत


लेवाजगत न्युज ठाणे:-ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा रस्त्यात सापडलेला मोबाईल पोलिसांना केला परत


ठाण्यातील वर्तकनगर येथील ब्राह्मण विद्यालयात शिकणाऱ्या चार शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यात एक मोबाईल सापडला. या चारही मित्रांनी हा मोबाईल वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणून जमा केला. शालेय विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी त्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. 

       


ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील ब्राह्मण विद्यालयातील विद्यार्थी सिद्ध सातपुते व त्याचे तीन मित्र हे शनिवारी शाळा सुटल्यावर घरी जात होते. यावेळी त्यांना एक मोबाईल रस्त्यात पडलेल्या आढळून आला. चारही मित्रांनी तो मोबाईल प्रामाणिकपणे वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केला. शालेय विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सृष्टी शिंदे व महिला पोलीस हवालदार यशोदा घोडे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शाबासकी दिली. त्यानंतर घोडे यांनी मोबाईलच्या मालकाचा शोध घेत त्यांना हा मोबाईल सुपूर्त केला. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.