Header Ads

Header ADS

श्रीक्षेत्र अंजाळे येथील दिंडीचे पंढरपूरात गुरूवारी होणार आगमन





श्रीक्षेत्र अंजाळे येथील दिंडीचे पंढरपूरात गुरूवारी होणार आगमन                                 

लेवाजगत न्यूज कुर्डुवाडी- यावल तालुक्यातील श्रीक्षेत्र अंजाळे ते पंढरपूर महाक्षेत्र पायी वारी दिंङी दिनांक १५/०६/२०२४ रोजी अंजाळे येथून निघाली होती. मुक्काम करत ही दिंङी आष्टी येथे आज पोहचत आहे. आणी उद्या गुरुवार रोज दिनांक ११/०७/२०२४ रोजी दिङीचे पंढरपूर महाक्षेत्रात आगमन होईल. वै.ह.भ.प. जगन्नाथ महाराज खान्देश भुषण यांची पायी वारीची परंपरा आज ह.भ.प धनराज महाराज यांनी आजही कायम ठेवली आहे.

 या दिंङीत विणेकरी ह.भ.प. चिंतामण महाराज, ह.भ. प. जितेंद्र महाराज, ह. भ. प. शालिग्राम महाराज, ह. भ. प. दिनेश महाराज, ह. भ. प. संजय महाराज, ह. भ. प. आकाश महाराज, ह. भ. प. जयेश महाराज, ह. भ. प. देवा महाराज ही संत मंङळी किर्तन ,भजन करत पंढरपूर महाक्षेत्र येथे प्रस्थान करीत आहे.चोपदार संतोष पाटील,रोशन कोळी हे लोक लक्ष ठेवून आहेत.

Srikshetra-Anjale-to-arrive-of-Dingi-in-Pandharpur-on-Thursday-


Srikshetra-Anjale-to-arrive-of-Dingi-in-Pandharpur-on-Thursday-




       दिंङी मध्ये सावदा येथील माजी नगराध्यक्षा सौ हेमांगी चौधरी या कुर्ङु येथून पायी वारी करीत आहे. तसेच माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,वासुदेव लोमटे,प्रतीक चौधरी,चुङामण भंगाळे,निळकंठ नेमाङे,सोमा पाटील,संदीप चौधरी,नामदेव चौधरी,अप्पा तायङे(जोगलखेङा) याचे सह रावेर ,यावल, भुसावल,जामनेर, जळगांव,सिल्लोङ,फुलंब्री,छत्रपती संभाजीनगर, पैठण तालुक्यातील १हजार लोकांचा सहभाग आहे लहान मुलांपासून ते म्हातारे वयस्करांचा सहभाग आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.