Header Ads

Header ADS

सावदा शहरात लाडकी बहीण योजनेचा फज्जा; महिलांकडून आकारले जात आहेत १०० ते ३०० रुपये

 

सावदा शहरात लाडकी बहीण योजनेचा फज्जा; महिलांकडून आकारले जात आहेत १०० ते ३०० रुपये


सावदा शहरात लाडकी बहीण योजनेचा फज्जा; महिलांकडून आकारले जात आहेत १०० ते ३०० रुपये 







लेवाजगत न्यूज सावदा- महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी "लाडकी बहीण योजना" नुकतीच सुरू केली आहे. सुरुवातीच्या काळात या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला अधिवास दाखला व साठ वर्षाखालील महिलांना योजनेचा लाभ घेता येईल अशा अटी होत्या परंतु नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जाचक अटी शिथिल करत ६५ वर्षापर्यंत वयोमर्यादा वाढवली आहे. 

सावदा शहरात अनेक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. महाराष्ट्र शासनाकडून मोफत अर्ज भरला जात असला तरी काही महाभाग मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महिलांकडून शंभर ते तीनशे रुपयापर्यंत फॉर्म भरण्याचे पैसे घेत आहेत यामुळे सावदा शहरात लाडकी बहीण योजनेचा फज्जा उडाला आहे.महिलांन कडून पैश्याची लूट फॉर्म भरणारे करीत आहे.कागदपत्रांची आवश्यकता नसतांना काही न लागणारे दाखले काढून जादा पैसे घेऊन लूट करीत आहे.

आधीच गोरगरीब महिलांजवळ पैसे नसतानाही उसनवारी करीत या महिला अर्ज भरण्यासाठी रक्कम द्यायला तयार होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ महिलांजून पैसे उकळणाऱ्या महाभागांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शहरातील  महिला व नागरिकांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.