Header Ads

Header ADS

सावदा येथे आज महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, अभिनेत्री किशोरी शहाणे, अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत योगराज फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

  

Savada-here-today-Mahamandaleshwar-Janardan-Hariji-Maharaj-actress-young-smart-actor-India-Ganeshpure-in-the-chief-presence-of-meritorious-students-honored-by-Yograj-Foundation-

सावदा येथे आज महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, अभिनेत्री किशोरी शहाणे, अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत योगराज फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

लेवाजगत न्यूज शाम पाटील सावदा-सावदा व परिसरातील गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी योगीराज फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे विनोद सोनवणे यांनी सावदा परिसरातील दहावी व बारावीमध्ये प्रत्येक शाळेमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळालेल्या तसेच (NEET) नीट परीक्षेत चांगले गुण मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले आहे.





    हा सोहळा आज रविवार दिनांक १४ रोजी सकाळी साडेदहा वाजता सावदा येथील जेहरा मॅरेज हॉल येथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रमास  महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज,अभिनेत्री किशोरी शहाणे, अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार असून या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे.या कार्यक्रमास सावदा व परिसरातील पालक ,नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.