Header Ads

Header ADS

सावदा पालिकेत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मोफत भरणे सुरू-मुख्याधिकारी भूषण वर्मा

 

Savada-Paliket-Ladki-Sister-Yojana-Form-Filling-Started-Chief-Director-Bhushan- Verma


सावदा पालिकेत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मोफत भरणे सुरू-मुख्याधिकारी भूषण वर्मा

लेवा जगत न्यूज शाम पाटील सावदा- महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सुरुवात झाली असून याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे. या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची झुंबड उडत असून व येणाऱ्या अडीअडचणी दूर व्हाव्या व ऑनलाइन फॉर्म लवकर भरले जावे यासाठी सावदा पालिकेतर्फे या योजनेचेऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी मोफत तीन ठिकाणी वसुली विभागात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





     तसेच पालिका संचलित नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर व श्री आ.गं. हायस्कूल येथे सुट्टीचे दिवस वगळून सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या वेळेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात येणार आहे. तरी महिलांनी वय वर्षे २१ वर्षे पूर्ण झालेल्या ते ६५ वर्षापर्यंत असलेल्या भगिनींनी कागदपत्रासह व आपला ओटीपी सेंड करण्यासाठी मोबाईल स्वतःचा घेऊन पालिकेत तथा पालिका संचलित कन्या शाळा व हायस्कूलमध्ये स्वतः उपस्थित राहून फॉर्म भरून घ्यावे. येथे फॉर्म मोफत वितरित केले जातील व ऑनलाईन सुद्धा फॉर्म येथेच मोफत भरले जातील तरी शहरातील महिला भगिनींनी याची नोंद घ्यावी व या मोफत योजनेचा लाभ घेऊन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.