Header Ads

Header ADS

सांगवी बुद्रुक शाळेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

Sangvi-Budruk-School- prize-distribution-ceremony in excitement


सांगवी बुद्रुक शाळेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात




  लेवाजगत न्यूज सांगवी बुद्रुक-तालुका यावल येथे बुधवार यादिवशी ज्योती विद्यामंदिर व ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालय शाळेत बक्षीस वितरण समारंभ साजरा करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष मा.श्री रशीद गंभीर तडवी सरपंच ग्रामपंचायत सांगवी बु ll तसेच प्रमुख पाहुणे मा.श्री.डॉ पंकज पाटील आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र  सांगवी बु ll व मा. श्री. शुभम पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र मदतनीस हे होते . बक्षीस वितरण समारंभाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.एम.भंगाळे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एम. एस. ताडेकर मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे बक्षीस वाचन श्री पी.एम .भंगाळे व श्री वाय.डी. नेमाडे सरांनी केले . बक्षीस वितरण वाचनामध्ये पारितोषिक व  दाते  यांचे वाचन करण्यात आले.बक्षीस वितरण समारंभामध्ये  सोहिनी प्रदीप भंगाळे, खुशबू विकास चौधरी,पालवी हेमंत चौधरी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. व आपल्या  मनोगतातून शाळेप्रती, शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला. यानंतर शिक्षकांचे मनोगत यामध्ये सौ.भावना नेहते मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर बक्षीस वितरक श्री डॉ.पंकज पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना कौतुकास्पद दोन शब्द सांगितले. शेवटी श्री. पी.एम.भंगाळे सरांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.