Header Ads

Header ADS

भरधाव कारने सहा महिलांसह मुलाला उडवले, एका महिलेचा मृत्यू नवशिक्या चालकाला लोकांनी चोपले; जमावाकडून कारची तोडफोड

 भरधाव कारने सहा महिलांसह मुलाला उडवले, एका महिलेचा मृत्यू


नवशिक्या चालकाला लोकांनी चोपले; जमावाकडून कारची तोडफोड

Rushing-car-six-women-along-with-child-one-woman-death-novice-driver-chopped-by-people-vandalized-car-by-mob



लेवाजगत न्यूज जळगाव-जळगावातील मेहरूण परिसरातील मंगलपुरी गल्लीत घरासमोर उभ्या व कामावरून घरी परतणाऱ्या पाच महिलांसह एका मुलाला भरधाव कारने उडवल्याची थरारक घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.शोभा पाटील तर पाच महिला व मुलगा गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारने धडक दिल्यानंतर ती महिला १५ ते २० फुटांपर्यंत उंच उडाली. दरम्यान, जमावाने कारचालकाला चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. शोभा रमेश पाटील (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे.





     मंगलपुरी भागात काही महिला घरासमोर गप्पा मारीत होत्या. तर काही कामावरून घरी येत होत्या. त्याचवेळी रामेश्वर कॉलनीकडून पवन कैलास पाटील (वय २५, रा. सप्तशृंगी कॉलनी, मेहरूण) हा त्याची नवीन कार (एम.एच.०५ ए.एस०५७४) घेऊन मामाकडे जात होता; परंतु पवन हा शिकाऊ चालक असल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले आणि एका मुलासह सहा महिलांना उडवले. यात दूध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील यांचा मृत्यू झाला. या अपघातात संगीता प्रकाश महाजन (४८), जयश्री जगदीश राऊत (३०), सुमनबाई साहेबराव पाटील (६५), अर्चना पाटील (४०), संगीता किशोर पाटील (४०), हर्षदीप प्रवीण सोनवणे (१५) हे जखमी झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.