Header Ads

Header ADS

होमगार्डच्या ९,७०० जागांची ६ वर्षांनी भरती; १६ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात

Recruitment-of-9700-posts-of-home-guard-after-6-years-application-process-starts-from-16-August


होमगार्डच्या ९,७०० जागांची ६ वर्षांनी भरती; १६ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात

लेवाजगत न्यूज छत्रपती संभाजीनगर:- नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण तरुणांना चांगली संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. होमगार्ड आस्थापनेवरील एकूण ९,७०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

  १६ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या प्रक्रियेत एकूण ३४ जिल्ह्यांतील होमगार्डच्या जागा भरण्यात येणार आहेत. यापूर्वी २०१८-१९ दरम्यान भरती झाली होती. आता सहा वर्षांनी होमगार्डची मेगा भरती होत आहे. होमगार्ड जवान या पदासाठी ९ हजार ७०० जागा रिक्त आहेत. २० ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी व कागदपत्रे पडताळणी केली जाईल.





या नोकरीसाठी उमेदवार ज्या त्या जिल्ह्याचा रहिवासी आहे, त्याच जिल्ह्यात नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेद्वारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही.

   या नोकरीसाठी १० वी आणि १२ वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणीद्वारे केली जाईल. आधी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर मैदानी चाचणी होईल. त्यात धावणे प्रकारात पुरुषांसाठी १६०० (२० गुण) तर महिलांसाठी ८०० मीटर (२५ गुण), गोळाफेक १० गुण आदींचा समावेश आहे. आयटीआय जिल्हास्तरीय क्रीडा, माजी सैनिक, एनसीसी, नागरी संरक्षण सेवेत किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र, जड वाहने चालविणे परवाना आदी तांत्रिक अर्हता पूर्ण केल्यास १० गुण मिळणार आहेत.

     शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

२० ते ५० वयोगटांतील १० वी उत्तीर्णांना या भरतीत सहभागी होता येईल. उंची: पुरुषांसाठी १६२ सेमी व महिलांसाठी १५० सेमी तर छाती: पुरुषांसाठी न फुगविता ७६ सेमी, फुगवून ८१ सेमी अर्हता निश्चित केली आहे.

    संकेतस्थळावरुन करा अर्ज

सहभागी होणाऱ्या उमेदवाराला अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर https://maharashtracdhg.gov.in/

https://maharashtracdhg.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर उमेदवाराला होमपेजवरील ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करावा लागेल. त्याठिकाणी ई-मेल आयडी, मोबाइल नंबर टाकून नोंदणी करावी. पुढे आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून लॉग इन करावे. यानंतर अर्ज ओपन होईल. तो संपूर्ण अर्ज भरावा लागेल. अर्जासोबत काही प्रमाणपत्रेही जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर भरलेला अर्ज उमेदवाराने परत तपासून पहावा, अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. सर्व बरोबर असल्यास सबमिट करून प्रिंट काढून घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.